पुणे : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे पुण्यात विश्व हिंदू मराठा महासंघाने अनोखे आंदोलन केलं आहे. कोश्यारी यांच्या फोटोची अंत्ययात्रा विश्व हिंदू मराठा महासंघाने पुण्यात काढली आहे. याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. पण या आंदोलनाला परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर कारवाई केली आहे.

दरम्यान, पुण्यातील चतु:र्शृंगी मंदिरापासून राजभवनापर्यंत ही अंत्ययात्रा काढण्यात आली होती. राज्यपाल यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली होती. पण या आंदोलनकर्त्यांकडे परवानगी नसल्यामुळे त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे.

अधिक वाचा  बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीचा ससून रुग्णालयामध्ये आत्महत्येचा प्रयत्न

काय म्हणाले होते राज्यपाल कोश्यारी?

औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शरद पवार यांनी डी. लीट पदवी बहाल केली. हा कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शरद पवार, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली. तर यावेळी शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते, गडकरी हे आत्ताच्या काळातील आदर्श आहेत असं आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी बोलताना केलं होतं.