जगासह भारतातही महिलांवरील हिंसाचाराची प्रकरण समोर येतात. महिलांवरील हिंसाचारातं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भारतातही महिलांवरील हिंसाचार, शारीरिक शोषण आणि लैंगिक शोषण झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान या संदर्भातील एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे, ज्यामध्ये धक्कादायक माहिती उघड झाली आहे. भारतात 3 पैकी 1 महिला शारीरिक किंवा लैंगिक शोषणाचा बळी ठरत असल्याचं या आकडेवारीतून समोर येत आहे. अनेक प्रकरणांमध्ये महिलेचा तिचा पती किंवा कुटुंबातील सदस्याच्या हिंसाचाराचा बळी ठरते.

Stats Of India मध्ये ही चिंताजनक आकडेवारी समोर

Stats Of India च्या आकडेवारीनुसार, भारतात तीन पैकी एक महिला तिचा नवऱ्याच्या शारीरिक किंवा लैंगिक शोषणाचा बळी ठरत आहे. यामध्ये सहा राज्यांमध्ये महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं दिसत आहे. या सहा राज्यांमध्ये 18 ते 49 वय असणाऱ्या विवाहित महिलांचा त्यांच्या पतीकडून शारीरिक किंवा लैंगिक छळ झाल्याचं उघड झालं आहे. या सहा राज्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर कर्नाटक राज्य आहे. कर्नाटकमध्ये महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर बिहार आणि मणिपूर तर तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूचा क्रमांक आहे. या पाठोपाठ महिलांवरील अत्याचाराच्या बाबतील तेलंगणा चौथ्या क्रमांकावर तर उत्तर प्रदेश पाचव्या क्रमांकावर आहे.

अधिक वाचा  राज्यपाल कोश्यारींकडून हुतात्म्यांचाही अनादर, राज्यपाल कार्यालयाचं हे स्पष्टीकरण

महिलांवरील अत्याचारासंदर्भात राज्यानुसार आकडेवारी

कर्नाटक : 44 टक्के     बिहार : 40 टक्के

मणिपूर : 40 टक्के       तमिळनाडू : 38 टक्के

तेलंगणा : 37 टक्के      उत्तर प्रदेश : 35 टक्के

याशिवाय शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिलांवरील वैवाहिक हिंसाचाराचं प्रमाण अधिक असल्याचेही समोर आलं आहे. शहरी भागातील 24 टक्के महिलांना पतीच्या हिंसाचाराचा सामना करावा लागतो, तर ग्रामीण भागातील 32 टक्के महिलांना या हिंसाचाराचा सामना करावा लागतो.

दरम्यान, पतीने दारू प्यायल्यावर पत्नीला मारहाण केल्याच्याही अनेक घटना आहेत. आकडेवारीनुसार, 70 टक्के महिलांना त्यांच्या पतीकडून दारू प्यायल्यानंतर मारहाण करण्यात आली. तर 23 टक्के महिलांना नवऱ्याने दारु न पिताही मारहाण केली आहे. म्हणजेच फक्त व्यसन हेच हिंसाचाराचं कारण नाही. इतकंच नाही तर 77 टक्के महिला अशा आहेत ज्यांच्या शारीरिक किंवा लैंगिक हिंसाचार झाला आहे, पण त्यांना त्याबद्दल कोणालाही सांगितलं नाही किंवा कुणाचीही मदत मागितली नाही. NFHS-5 2019-21 च्या सुत्रांनुसार 62 हजार 381 महिलांवर केलेल्या संशोधनाच्या आधारे स्टॅट्स ऑफ इंडियाने ही आकडेवारी जाहिर केली आहे.