नाशिक : मागील दोन महिन्यांपासून महाराष्ट्र एटीएसकडून पीएफआयच्या संबंधित कारवाई सुरूच असून नुकतीच मालेगावमध्ये आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. मालेगावातून इमाम कौन्सिलचा अध्यक्षाला एटीएसच्या पथकाने अटक केली आहे. मौलाना इरफान नदवी असे संशयित व्यक्तीचे नाव असून त्यास मुंबईच्या दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली आहे. नाशिक जिल्ह्यात पीएफआय संघटनेची पाळेमुळे रुजल्याचे या प्रकरणावरून दिसून येत असून सातत्याने कारवाया होत असल्याने मालेगावमध्ये खळबळ उडाली आहे. पीएफआय आणि मालेगाव कनेक्शन पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या एटीएसच्या कारवाईत मालेगावमध्ये एक मोठी कारवाई झाली होती. पीएफआयच्या संदर्भात अनेक धक्कादायक पुरावे हाती लागल्याने खळबळ उडाली होती. देशाच्या विरोधात कट रचणे, राममंदिर पाडणे यांसारख्या बाबी समोर आल्या होत्या, त्यामुळे एटीएसकडून आणखी सखोल तपास केला जात असून आज पुन्हा एकाला एटीएसने अटक केली आहे.

अधिक वाचा  आपले होम लोन EMI कधीही चुकवू नका!

सप्टेंबर महिन्यात झालेल्या कारवाई टेरर फंडिंगप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने रविवारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेचा माजी जिल्हाध्यक्ष मौलाना इरफान दौलत नदवीला अटक केली.शनिवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली असून नुकतेच त्याला न्यायालयात हजर केले होते, त्याच्या विरोधात सबळ पुरावे हाती लागल्याने त्याच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. देशाच्या गृहविभागाने पीएफआय या संघटनेवर बंदी घातली असून देशभरात विविध पदाधिकारी यांच्या विरोधात ही कारवाई केली जात असून एटीएसची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. यापूर्वी मालेगाव येथून अटक केलेल्या यादीत मौलाना सहेफू रहेमान सईद अहमद याचा समावेश होता, त्यावरून संपूर्ण राज्यभर या कारवाईच्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या.

अधिक वाचा  उद्या मुख्यमंत्री फडणवीसांची शपथ तरी ‘त्या’ जखमांचा भाळलेल्याचं! निवडीनंतर पहिल्याच भाषणावेळीही भावुक

सप्टेंबरमध्ये झालेल्या कारवाईत मौलाना नदवी आणि सादेन शाहिद इक्बाल अन्सारी यांना अटक करण्यात आली होती, त्यावेळी नदवी याला सोडून देण्यात आले होते. मात्र, तपासा दरम्यान नदवी याचाही सहभाग दिसून आल्याने शनिवारी पुन्हा एटीएस पथकाकडून ही कारवाई करण्यात आली असून मालेगाव आणि पीएफआय कनेक्शन पुन्हा एकदा समोर आले आहे.