आज देशभरात दुर्गाविसर्जनाचा उत्सव साजरा होत आहे. यावेळी पश्चिम बंगालमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मालबाजार शहरातील नदीला अचानक आलेल्या पूरामध्ये जवळपास 100 जण वाहून गेल्याचं समोर आलं आहे. नदीमध्ये वाहून जाणाऱ्यांचा अधिकृत आकडा अद्याप समोर आला नाही. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.

काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाहून गेलेल्या इतरांचा शोध घेण्यात येत आहे. भूटानकडून अचानक आलेल्या पुरामुळे नदीचा जलस्तर अचानक वाढला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पश्चिम बंगालमधील जलपाईगुढी क्षेत्रातील मालबाजार शहरामध्ये घडली. घटनेची माहिती मिळाताच बचाव पथक दाखल झाले आहे. या घटनेबाबात अधिक माहिती समोर आलेली नाही. याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत.

अधिक वाचा  महायुतीत जागावाटप गुंता असताना भाजपच्या मात्र सुस्साट 23 जागांचे वाटप शिंदे-अजितदादांच्या पदरी निराशाच?