जम्मू : जम्मू काश्मिरमध्ये दहशतवादी कारवाया वाढत असताना मागच्या आठ तासांत दुसरा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. उदमपूर येथे पार्किंगमध्ये लावलेल्या ट्रॅव्हल बसमध्ये हा स्फोट झाल्यामुळे खळबळ उडाली असून या स्फोटात कुणीही जखमी झाले नाही. तर आज पहाटेच्या दरम्यान हा अपघात घडल्याची माहिती आहे.

दरम्यान, बुधवारी रात्री 10.45 च्या सुमारास काश्मिरातील डोमाईल चौकात बसमध्ये असाच गूढ स्फोट झाला असून त्यात दोघे जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून अधिकचा तपास पोलिस करत आहेत. तर दुसरा स्फोट आज पहाटे झाला असून पहिल्या घटनास्थळापासून फक्त ४ किमी अंतरावर झाला आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून पोलिस आणि सुरक्षा जवान सतर्क झाले आहेत.

अधिक वाचा  उदयनराजे यांचे अश्रू म्हणजे…; संजय राऊतांची प्रतिक्रिया

दरम्यान, या घटनेत ट्रॅव्हलचे नुकसान झाले असून पोलिस आणि तपास संस्थाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर अधिक तपास सुरू असल्याची माहिती आहे.