Vikram Vedha : हृतिक रोशन  आणि सैफ अली खान  यांचा ‘विक्रम वेधा’ सिनेमाची रिलीज डेट जवळ येत आहे.30 सप्टेंबरला सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. फॅन्सही या सिनेमाची आतुरतेने वाट बघत आहेत. सिनेमाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. रिलीजआधीच सिनेमातील कलाकारांचे लूक आणि स्टोरीबाबत उत्सुकता वाढली आहे.

हृतिक रोशनचा लूक फारच इंटेन्स होता. जो फॅन्सना खूप आवडला. तर सैफ पोलीस अधिकाऱ्याच्या लूकमध्ये भारी वाटतोय. इतकंच नाही तर सिनेमातील गाणीही चांगली हिट ठरली. पण तुम्हाला माहीत नसेल की, या सिनेमासाठी कलाकारांनी किती मानधन घेतलं.

अधिक वाचा  संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट, राष्ट्रवादीचा मोठा निर्णय!

हृतिक रोशन बॉलिवूडच्या सगळ्यात टॉपच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने अनेक सिनेमातून आपली वेगळी छाप सोडली आहे. 2019 मध्ये वॉर सिनेमानंतर आता तीन वर्षानंतर सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तो एका व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमासाठी सगळ्यात जास्त मानधन हृतिक रोशन याने घेतल्याचं समजतं. हृतिकने या सिनेमासाठी 50 कोटी रूपये मानधन घेतलं आहे.

या सिनेमात सैफ अली खान एका इमानदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. सैफचा लूकही फार डॅशिंग आहे. फॅन्सना त्याचा अवतार चांगला आवडला. हृतिकसोबतच सैफही या सिनेमातील मोठा चेहरा आहे. रिपोर्ट्सनुसार, सैफ अली खानने या सिनेमासाठी 12 कोटी रूपये मानधन घेतलं आहे.

अधिक वाचा  नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; चालकाचं नियंत्रण सुटलं, सात जण जखमी

राधिका आपटेने तिच्या मेहनतीने आणि वेगवेगळ्या भूमिकांमधून बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख तयार केली आहे. या सिनेमात राधिका एका वकिलाची भूमिका साकारत आहे. तसेच ती या सिनेमात सैफ अली खानच्या पत्नीची भूमिकाही करत आहे. रिपोर्ट्सनुसार, राधिकाने या सिनेमासाठी 3 कोटी रूपये मानधन घेतलं.