मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त Pune on Pedals या सायकल रॅली चे आयोजन प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांच्या वतीने करण्यात आले आहे. मा. गिरीश महाजन क्रीडामंत्री यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थितीत मा चंद्रकातदादा पाटील तसेच क्रीडा पटू मारुती गोळे, आशिष कासोदेकर, अतुल गोडबोले, प्रीती मस्के, संजय राव, चेतन येवलेकर, समृद्धी कुलकर्णी, निलेश मिसाळ, शंकर गाढवे, राहुल नलावडे, सुनील कुकडे, कल्याणी टोकेकर, आरती चव्हाण, बाळकृष्ण नेहरकर, आनंद कंसल आदी सायकलपटू यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सायकल रॅलीची सुरुवात- स 5.30 वाजता छ. शिवाजी महाराज स्मारक कोथरूड ते झाशीची राणी स्मारक बालगंधर्व चौक आपणा सर्वांना आवाहन की पुण्यातील सर्व सायकल प्रेमींनी आपले नाव नोंदवावे. प्रवेश विनामूल्य आहे. स्वतःची सायकल आवश्यक, पाण्याची बाटली घेऊन यावे. प्रत्येक सहभागी व्यक्तीस T shirt, मेडल आणि सर्टिफिकेट दिले जाईल. अधिक माहितीसाठी आयोजक प्रा. कुलकर्णी 9422037306 व निलेश मिसाळ 8329579612 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.