पुणे : राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी याकूब मेमन याच्या कबरीचे सुशोभीकरण केल्यावरून पेटलेल्या वादावर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. अशा समाजकंटकांना कुणीच महत्त्व देऊ नये असं म्हणत या सरकारचा जनतेचं विकास कामापासून लक्ष विचलीत करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.

या प्रकरणावर संताप व्यक्त करत अजित पवारांनी सकारवर निशाणा साधला आहे. “यासंदर्भात मला माहिती नाही, आता मी माहिती घेतो पण अशा समाजकंटक आणि देशद्रोह्यांबद्दल बोलण्याचा प्रयत्न करू नये.” असं पवार म्हणाले. त्याचबरोबर “असे काहीतरी मुद्दे काढायचे आणि जनतेचं मन विचलीत करायचं. यांच्याकडे बेरोजगारी, महागाई अशा मुद्द्यांवर बोलण्यासाठी उत्तरं नाहीत. सध्या राज्यातील शेतकरी हवालदील झाला आहे. रोज आत्महत्या होत आहेत. या प्रश्नाकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही. या प्रश्नावरून डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न यांच्याकडून केला जात आहे.” असा आरोप अजित पवारांनी केला आहे.

अधिक वाचा  “संतोष देशमुख ही एका व्यक्तीची नाही, तर नैतिकतेची हत्या मान खाली गेली”; पंकजा मुंडेंनी मांडली सविस्तर भूमिका

दरम्यान, ही घटना कुणाच्याही सरकारच्या काळात व्हायला नव्हती पाहिजे, अशा घटना होऊ नयेत असं ते म्हणाले. त्याचबरोबर शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याचा मान हा दरवर्षी शिवसेनाच असतो पण शिंदे गट आणि शिवसेनेत चाललेल्या मेळाव्याच्या वादावरील निर्णय न्यायालय देईल असं मत पवारांनी व्यक्त केलं.