कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय आरोग्य विभागाच्या वतीने नविन समाविष्ट बावधन गावामध्ये रिकाम्या गायरान परिसरात विनापरवाना रात्री अपरात्री मुजोर ट्रक धारक राडारोडा टाकून निसर्गरम्य खाजगी रिकाम्या जागेच्या परिसरात घाण व विद्रुप करत होते. कोण राडारोडा टाकतय याचा सुगावा काढण्यासाठी वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली “सुगावा पथक” नावाचे पथक तयार करण्यात आले.
प्रभाग क्रं. १०, ११, १२ या तिनही प्रभागात सुगावा पथकाची नियुक्ती करण्यात आली. सदर पथकामध्ये त्या त्या कार्यक्षेत्रातील आरोग्य निरिक्षक, मोकादम व तीन सेकाची नेमणूक करण्यात आली. या पथकाची पहिली धडक नविन समाविष्ट बावधन गावातील आरोग्य निरिक्षक हनुमंत चाकणकर, गणेश चोंधे, करण कुंभार, सचिन लोहकरे मोकादम राम गायकवाड, वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे यांनी राडारोडा टाकणाऱ्या ट्रक धारकांना सापळा रचून पकडण्यात आले. तद्नंतर त्यांच्या कडून ८५ हजार रुपये शुल्क दंडात्मक कारवाई करून वसूल करण्यात आले.
सरकारी किंवा निमसरकारी रिकाम्या जागेवर कचरा व राडा रोडा टाकू नये, आपले पुणे शहर स्वच्छ ठेवा. अनाधिकृत व अधिकृत बांधकाम व्यवसायीक यांनी कचरा, राडारोडा टाकणे व पोस्टर, लावून पुणे शहरांच्या निसर्ग रम्य परिसर घाण करू, नका ……! आणि आपले आरोग्य धोक्यात आणू नका असे आवाहन करण्यात आले. तसेच येथून पुढे जर विनापरवाना राडारोडा टाकला तर ट्रक जप्त करण्यात येईल व मोठ्या प्रमाणात कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे राम सोनवणे यानी म्हटले आहे.
सदर कारवाई महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वझे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वा खाली आरोग्य निरिक्षक हनुमंत चाकणकर, गणेश चोंधे, करण कुंभार, सचिन लोहकरे, गणेश साठे, वैभव घटकांबळे, शिवाजी गायकवाड, नवनाथ मोकाशी, संतोष ताटकर, रुपाली शेडगे, प्रमोद चव्हाण, सतीश बनसोडे, मोकादम राम गायकवाड, वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे यांनी सहभागी होऊन दंडात्मक कारवाई करण्यात आली. सदर कारवाईचे बावधन ग्रामस्थांनी फार मोठ्या पमाणात कौतुक केले.