शेकडो वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा गणेशोत्सवाचे कार्यकर्ते व मंडळे अखंडपणे महाराष्ट्राची व देशाची ओळख म्हणून जगामध्ये निर्माण करीत आहेत. याला सर्व समाजाकडून, प्रशासनाकडून चांगल्या पद्धतीने साथ मिळत आहे. परंतु यामध्ये काही विघ्न संतोषी घुसल्यामुळे मंडळांना बदनाम करून मंडळे म्हणजे जबरदस्तीने वर्गाना घेणारे, खंडण्या घेणारे, दादागिरी करणारे अशी प्रतिमा मलीन करून अनेक ठिकाणी व्यापारी संघटना काही राजकीय पक्षांच्या व्यक्तींकडून काढल्या गेल्या. परंतु या राजकीय व्यक्तींकडून या व्यापारी संघटनेचा गैरवापर मंडळांबाबत गैरसमज पसरवुन राजकीय स्वार्थासाठी वापर केला जाऊ लागला आहे. यावर कारवाई करण्याची मागणी सामजिक कार्यकर्ते सचिन धनकुडे यांनी केली आहे.

या राजकीय व्यक्तींकडून मंडळांना वेठीस धरला जाऊ लागला माझा प्रचार माझ्या पक्षाचा प्रचार निवडणुकांमुळेच करावा अशी अपेक्षा मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून ठेवली जाऊ लागली आहे.जो त्यांचे ऐकेल त्यांना जास्त वर्गणी. जो ऐकणार नाही ,तटस्थ राहील त्यांना कमी वर्गणी .अशा पद्धतीचा भेदभाव या राजकीय व्यक्तींकडून चालवल्या जाणाऱ्या व्यापारी संघटनांच्या माध्यमातून चालू झालेला आहे.

अधिक वाचा  कोल्हापुरात धक्कादायक वृत्त माजी आमदाराच्या पुतण्याचा जागीच मृत्यू गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका

याबद्दल अशा पद्धतीने आपल्या व्यापारी संघटनेचा गैरवापर राजकीय कारणांसाठी व यांच्या वर्गण्या वाचवण्यासाठी, राजकीय प्रस्थ वाढवण्यासाठी होतोय व चांगले काम करणाऱ्या मंडळांवर कमी वर्गणी देवून अन्याय होतोय याची जाणीव व्यापाऱ्यांना सुद्धा नाही. राजकीय पुढार्‍यांनी स्वतःची वर्गणी वाचवण्यासाठी हा नवीन उद्योग तयार केला आहे. त्यामुळे आम्ही आपल्याकडे अशी मागणी करीत आहोत की, या सर्व व्यापारी संघटनांना आपण बोलून कोणत्या पद्धतीने कोणत्या निकषावर मंडळांना तुम्ही वर्गणी देता, सर्व व्यापाऱ्यांकडून कंपल्सरी ठराविक रकमेचीच वर्गणी का घेता? छोट्या ऐपत नसेल तर बळजबरीने गणेश उत्सवाच्या मंडळांची भीती घालून मोठमोठ्या रक्कम का घेता? याची भविष्यातील धोके ओळखून सखोल चौकशी करावी. अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 या विषयावर आमचे काही म्हणणे आहे ते पुढील प्रमाणे-

कंपल्सरी चार-चार हजार वर्गणी का घेतात? ही बळजबरी नाही का? ही खंडणी नाही का?

अधिक वाचा  संतोष देशमुख प्रकरणाची पहिली सुनावणी; वाल्मिकचा उतरला माज, कोर्टात आकाला पाहून चेलेही हादरले

व्यापारी संघटना धर्मदायुक्तांकडे रजिस्टर आहेत का?

जमा केलेल्या रकमेचा ऑडिट केलं जातं का? ऑडिट न करता जमा केलेली रक्कम ते ब्लॅक मनी नाही का?

व्यापारी संघटना मोठमोठ्या भिष्या,फंड चालवतात त्या कायद्याच्या कक्षेत बसतात का?हा दोन नंबरचा पैसा नाही का?

मंडळांना जसं मीटिंग घेऊन सूचना करता नियम सांगता त्याचप्रमाणे व्यापारी संघटनांना बोलवून नियम, कायदे, सूचना का नाही सांगत?

कोणत्या मंडळांना किती वर्गणी देता हे कशाच्या आधारावरती ठरवता?

व्यापारी संघटना राजकीय पुढारी चालवत असल्यामुळे मंडळांना वेठीस धरलं जातं की तुम्ही माझ्या प्रचार का करत नाही? माझ्या पक्षाचा प्रचार का करत नाही? निवडणुकीमध्ये मला सहकार्य का करत नाही ?अशा प्रकारच्या छुप्या अपेक्षा ठेवतात की वाढदिवसाला, रॅलीला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यावं

कोणकोणत्या मंडळांना किती किती वर्गणी दिली जाते याची माहिती त्यांनी पोलिसांना व मंडळांना द्यावी

मंडळे फार वाईट आहेत खंडणी गोळा करतात, दमबाजी करतात अशा पद्धतीचे भूत व्यापाऱ्यांच्या पुढे उभे करून व्यापारी संघटनांकडून जी वर्गणी गोळा केले जाते ती व्यापाऱ्यांसाठी ऐच्छिक स्वरूपाची का नाही? चार-चार हजार रुपये वर्गणी एका एका व्यापाऱ्याकडून गोळा करतात.

अधिक वाचा  ‘स्थानिक’च्या निवडणुका लांबल्या ‘या’ पदासाठी जोरदार लावली फिल्डिंग; 2025-26 चे 1200 कोटींचे अंदाजपत्रक

ज्याप्रमाणे गणेशोत्सव मंडळांना बोलून सूचना करता. त्याचप्रमाणे व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून सुद्धा त्यांना पण सूचना करा. त्यांना विचारा कोणत्या मंडळांना किती वर्गणी द्यायची हे व्यापारी संघटनेमधील कोण-कोण ठरवतं. याची मंडळांना माहिती द्या.कोणते निकष लावून वर्गण्या देता याची पोलीसांमार्फत चौकशी करा.

वर्गणीच्या नावाखाली आम्ही मंडळांनी ते जे सांगतील त्या पक्षांचा प्रचार करावा राजकीय त्यांच्या भूमिकेला मी सपोर्ट करावा त्यांच्या पक्षांना मतदान करावा अशा पद्धतीचे अपेक्षा ठेवून मंडळाच्या कार्यकर्त्यांना वर्गणीसाठी वेठीस धरलं जात आहे.

वर्गणी एकत्र जमा करता तर ती वाटप करण्यासाठी एक कमिटीने नेमा त्यामध्ये व्यापारी, पोलीस अधिकारी, कॉर्पोरेशन अधिकारी, गणेश मंडळाच्या संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता इत्यादी.