भाजपच्या संघटनात्मक पातळीवरच्या महत्वाच्या नेमणुका नुकत्याच जाहीर झाल्या. त्यात महाराष्ट्रासाठी सर्वात मोठा संदेश दडला आहे. नितीन गडकरींची पार्लमेंटरी बोर्डातून एक्झिट हा सगळ्यात मोठा शॉक मानला जातोय. भाजपच्या पक्षीय संघटनेतला सर्वात मोठा बदल जाहीर झाला असून त्यात सर्वात धक्का महाराष्ट्राचे नेते नितीन गडकरी यांना बसलाय. संसदीय समिती, भाजप पक्षातल्या सर्वोच्च समितीतून नितीन गडकरी यांना वगळण्यात आलंय. त्यात काही महत्वपूर्ण बदल पक्षानं केले आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षानं आपले दिग्गज नेते आणि नरेंद्र मोदी मंत्रिमंडळातील परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पक्षाच्या संसदीय मंडळातून काढून टाकण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेऊन लोकांना आश्चर्यचकित केलं. मात्र, या निर्णयाला संघ नेतृत्वानंही सहमती दर्शवल्याचं बोललं जातंय. गडकरींच्या वक्तव्यामुळं आणि भाष्य करण्याच्या प्रवृत्तीमुळं भाजप आणि संघ दोघंही नाराज झाले होते.

अधिक वाचा  सुनीता विल्यम्स अंतराळात या देवाची मूर्ती घेऊन गेली? कुंभमेळ्याचे एक छायाचित्र पाठवले… बहिणीकडून गुपित उघड

भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघ नेतृत्वानं भाजपचे माजी प्रमुख गडकरींना वेळोवेळी केंद्र सरकार आणि पक्षाबद्दल बोलताना सावध केलं होतं. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, नितीन गडकरींनी संघाच्या दृष्टिकोनाकडं दुर्लक्ष केलं. त्यानंतर आरएसएस नेतृत्त्वानं भाजप नेतृत्वाला सुचवलं की, पक्षानं त्यांना संसदीय मंडळातून काढून टाकण्यासह योग्य ती कारवाई करावी.

संघाच्या कठोर भूमिकेमुळं भाजप नेतृत्वाला मदत झाली, जे आधीच गडकरींच्या वक्तव्यामुळं अस्वस्थ होते. त्यानंतर गडकरींना पक्षाच्या सर्वोच्च समितीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. संसदीय मंडळातून गडकरींच्या हकालपट्टीला अनेकांनी कठोर पाऊल मानलंय. भाजपच्या एका वरिष्ठ सूत्रानं सांगितलं की, “भाजपपेक्षा आरएसएस अनेकदा त्यांच्या विधानांनी जास्त नाराज होतं. असं न करण्याचा सल्ला देऊनही नितीनजी अशीच टीका करत असतं.”

अधिक वाचा  अखेर सुनिता विल्यम्सचं सुखरूप आगमन; 9 महिन्यांनी पृथ्वीवर रोमांचक पुनरागमन सुखरूप परतली भारत की बेटी

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना संसदीय मंडळातून हटवण्याबाबत सूत्रांनी सांगितलं की, कोणत्याही मुख्यमंत्र्याला मंडळाचा भाग बनवलं जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आलाय. “आता आमच्याकडं बरेच मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही त्यांच्यात फरक करू शकत नाही.”

भाजपच्या संसदीय समितीतून गडकरी बाहेर

भाजपच्या संसदीय समितीत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांना संधी दिली गेलीय. तर दुसरीकडं भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना वगळण्यात आलंय. संसदीय समितीत आता अध्यक्ष जे पी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, येडीयुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, श्री के लक्ष्मण, इक्बाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया, बी एल संतोष या अकरा जणांचा समावेश असेल. भाजपच्या या संसदीय समितीत आता महाराष्ट्रातला एकही नेता नाहीय.

अधिक वाचा  संतोष देशमुख प्रकरणात ट्विस्ट, कृष्णा आंधळेचा साथीदार कोण?ओळख पटवल्यानंतर ज्या प्रमाणे बाईक पळवली, त्यानुसार त्याला…