स्विस बँकेतील 2 खात्यात काळा पैसा ठेवल्या प्रकरणी अनिल अंबानी यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. त्याच बरोबर आयकर विभागाने 2 स्विस बँकेतील खात्यात तब्बल 814 करोड पेक्ष्या जास्त काळा पैसा ठेवला आहे. आणि 420 करोड रुपयांचा टॅक्स बुडवल्याचा आरोप रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या वर आहे, काळा पैसा कायद्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे.
विभागाने 63 वर्षीय अंबानी यांच्यावर कर बुडवल्याचा आरोप लावला आहे, असे म्हटले आहे की त्यांनी हेतुपूर्वक त्यांच्या परदेशी बँक खात्याचे तपशील आणि आर्थिक व्यवहार भारतीय कर अधिकाऱ्यांना सांगितले नाहीत. या प्रकरणी अंबानी यांना या महिन्यात कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. विभागाने म्हटले आहे की या प्रकरणात अनिल अंबानी यांच्यावर काळा पैसा, अघोषित परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता, कर कायदा 2015 च्या कलम 50 आणि 51 अंतर्गत खटला चालवला जाऊ शकतो. ज्यामध्ये दंडासह 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील होवु शकते. अनिल अंबानी यांना 31 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.
या संदर्भात अनिल अंबानी किंवा त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेल नाही. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, अनिल अंबानी यांच्यावर 2012-13 ते 2019-20 या दरम्यान विदेशी बँकांमध्ये अघोषित मालमत्ता ठेवून कर बुडवल्याचा आरोप आहे.