पुण्यातून मे महिन्यात अटक करण्यात आलेला संशयित दहशतवादी जुनैद मोहम्मद आणि त्याचे साथीदार दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील तीन महत्वाच्या लोकांवर हल्ल्यांच्या तयारीत होते, अशी धक्कादायक माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. तसेच भाजपच्या रॅलीवर हल्ल्याचाही त्यांचा प्लॅन होता अशी माहितीही खात्रीलायक सुत्रांकडून मिळतेय.

सुत्रांच्या माहितीनुसार, नरसिंहानंद सरस्वती, गायक संदीप आचार्य आणि जितेंद्र नारायण उर्फ वसीम रिझवी या तीन लोकांवर हल्ला करण्याची योजना पु्ण्यातून अटक करण्यात आलेले संशयीत दहशतवादी आखत होते. त्याचबरोबर उत्तर भारतात आगामी काळात होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या रॅलीवर देखील हल्ला करायचा त्यांचा मनसुबा होता. विशेष म्हणजे या हल्ल्यांसाठी त्यांना स्फोटकं तयार करण्यासाठी लागणारी साधनं आणि पैसे हे थेट पाकिस्तानातील मास्टरमाईंडकडून येणार होते.

अधिक वाचा  संतोष देशमुख हत्या फरार कृष्णा आंधळेचा ठावठिकाणा लागला; नाशिकमधील सीसीटीव्ही फूटेज आले समोर…

हल्ल्याचा जी योजना होती ती यशस्वी करण्यासाठी पुण्यातून जुनैद मोहम्मद निघण्याच्या तयारीत होता. मात्र त्याआधीच राज्य दहशतवादविरोधी पथकानं त्याला ताब्यात घेतलं. जुनैद मोहम्मद सोशल मीडियावर सक्रीय होता. त्यानं आत्तापर्यंत १७ हून अधिक फेक फेसबूक अकाउंट तयार केले होते आणि त्याद्वारे तो इतरांशी संवाद साधायचा.

जुनैद मोहम्मद आणि त्याचे साथीदार दिल्ली आणि उत्तरप्रदेशात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याचं काही दिवसांपूर्वी निष्पन्न झालं होतं. काश्मीरमधील दहशतवादी संघटनेकडून जुनैदला दहशतवादी कारवायांसाठी फंडिंग झाल्याचं याआधी झालेल्या तपासात निष्पन्न झालं आहे. जुनैदला पुण्यातील दापोडी भागातून २४ मे रोजी ताब्यात घेण्यात आलं होतं.

अधिक वाचा  “शिंदे तेव्हा मोदींच्या कचऱ्याच्या डब्यात होते”, ठाकरेंनी बाण डागताच, शिंदेंनीही केला पलटवार, मी डॉक्टर नसलो तरी मोठं ऑपरेशन केलंय!

कोण नरसिंहानंद, संदीप आचार्य आणि वसीम रिझवी?

नरसिंहानंद सरस्वती हे गाझियाबादमधील शिवशक्ती धामचे महंत आहेत. ते हिंदू स्वाभिमान नावाची संस्था देखील चालवतात. अनेकदा प्रक्षोभक वक्तव्यांमुळं ते चर्चेत आले आहेत. तर उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम रिजवी ऊर्फ जितेंद्र नारायण ज्यांनी हिंदू धर्मात प्रवेश केला होता. तसेच संदीप आचार्य हे उत्तर प्रदेशील गायक असून आपल्या वादग्रस्त गाण्यांमुळं ते चर्चेत आले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे स्टार प्रचारक म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.