शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान, यापूर्वी त्यांनी शिवसेना उपनेत्यासोबत बैठक घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे महाराष्ट्र फिरत आहेत तुम्हीही लोकांपर्यंत पोहचले पाहिजे. सर्व उपनेत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढा. असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसेच, आपण आपली कामं जनतेपर्यंत पोहचवली पाहिजे. त्यासाठी आपल्या प्रत्येक घराघरात पोहचावं लागणार आहे. असे आवहान करत आदित्य ठाकरेंना महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे याचा अर्थ जनता आपल्या सोबत आहे. असे ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे. यासोबतच आदित्य ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरेदेखील महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. लवकरच ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.
सध्या आदित्या ठाकरे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी पक्ष बांधणीला सुरूवात केली आहे. त्यासाठी ते महाराष्ट्र दौर करत आहेत. यादरम्यान त्यांनी बंडखोरांवर सडकून टीका केली आहे. आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधत हे बेकायदेशीर सरकार आहे, कोसळणार म्हणजे कोसळणार अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे.