दहीहंडीच्या निमित्ताने मुख्यमंत्री म्हणाले आम्ही 50 थर लावले, आणि आता मलई खाणार? गद्दारांना मिळाली का मलई? त्यांना मिळाला बाबाजी का ठुल्लू अशा कडक शब्दांत मुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवत घणघणात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर केला. आदित्य ठाकरे यांचा बंडखोर आमदारांवर हल्लाबोल सुरूच आहे. ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आज पाचोरा येथे पार पडली. यावेळी, दहीहंडीच्या निमित्ताने मुख्यमंत्री म्हणाले आम्ही 50 थर लावले, आणि आता मलई खाणार? गद्दारांना मिळाली का मलई? त्यांना मिळाला बाबाजी का ठुल्लू अशा कडक शब्दांत मुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न ठाकरे यांनी केला.

अधिक वाचा  बचतगट प्रभागातून उत्कृष्ट सी.आर.पी. पुरस्काराने शुभांगी मोहिते सन्मानित

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी आता आदित्य ठाकरे थेट मैदानात उतरले आहेत. सध्या आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद दौरा जोरदार शक्ती प्रदर्शनात सुरू आहे. सध्या शिवसंवाद दौऱ्याचा तिसरा टप्पा सुरू आहे. आज ते जळगावदौऱ्यावर आहेत. यावेळी आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. दोन महिन्यांत राज्यात काय झाले हे तुम्हाला मान्य आहे का? 50 खोके बरोबर जाण सोपं आहे, पक्षा सोबत राहणं महत्वाचे आहे. सध्या महत्वाचा काळ असून राज्यभर शिवसंवाद यात्रेला प्रेम मिळत आहे, पुढचा काळ शिवसेनाचा असेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

अधिक वाचा  देवेंद्र फडणवीस यांनी घेतली PM मोदी यांची भेट, ‘या’ तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

शिवसेनेला संपवण्याचाच नव्हे तर ठाकरे कुटुंबीयांना संपवण्याचे काम सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. गद्दार जेव्हा गुवाहाटी आणि गोव्यामध्ये फिरत होते. त्यावेळी ते स्वतःला शिवसैनिक म्हणून घेत होते. मात्र यावेळी या सर्व गद्दारांनी मस्ती करत महाराष्ट्राची लाज घालवली, असा घणाघातही आदित्य ठाकरे यांनी केला. जिथे आहे तिथे आनंदाने राहा मात्र थोडीशी लाज उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या व निवडणूक लढा असं आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केले. मातोश्रीचे दरवाजे तुमच्यासाठी कायम उघडे राहतील असंही यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.