आरटीओ पुणे कार्यालयावर बाईक टॅक्सी बंद करण्यात यावी तसेच इतर अनेक प्रलंबित मागण्यासाठी व मागण्यांचे निवेदन देण्यासाठी समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष आनंद तांबे तसेच महाराष्ट्र रिक्षा पंचायत समिती चे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. याप्रसंगी माननीय श्री अजित शिंदे साहेब प्रादेशिक परिवहन अधिकारी त्याचप्रमाणे माननीय श्री संजय भोर साहेब उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे त्याचप्रमाणे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले यांच्या समवेत १ तास प्रदीर्घ चर्चा झाली.

रॅपिडो बाईक टॅक्सी बंद झाली पाहिजे

अधिक वाचा  एका दिशाभ्रम बुद्धीभ्रम झालेल्याचा आक्रस्ताळी विलाप; राज ठाकरेंच्या टीकेला कॉंग्रेसचं प्रत्युत्तर

खुले परवाने बंद झाले पाहिजेत

बेकायदेशीर वाहतूक बंद झाली पाहिजे

ई रिक्षाला परमिट ची सक्ती करण्यात यावी इत्यादी अनेक मागण्यांच्या वर सविस्तर चर्चा झाली.

टॅक्सी बाइक बंद करण्याच्या दृष्टीने आरटीओ पुणे यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनला दाखल केलेली एफ आय आर व इतर कायदेशीर कागदपत्रे सादर करून संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सविस्तर माहिती दिली. कारवाई चालू करण्यासंबंधी व लवकरात लवकर टॅक्सी बाईक बंद करण्यासंबंधी आदेश आरटीओ पुणे यांनी संबंधितांना दिलेले आहेत.

येत्या काळात रॅपिडो बाईक टॅक्सी बंद होईल अशी आम्हास खात्री वाटते परंतु रॅपिडो बाईक टॅक्सी नजीकच्या काळात बंद न झाल्यास यापुढे अतिशय तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे अध्यक्ष आनंद तांबे व सर्व रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय श्री मानकर साहेब यांनाही सदर निवेदनाची एक प्रत संघटनेच्या वतीने देण्यात आली त्यांनी सुद्धा लवकरात लवकर या रॅपिडो बाईक चालकांवर ठोस व कायमस्वरूपी कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.

अधिक वाचा  “मी शेवटपर्यंत पत्नीधर्म निभावला पण…” मानसी नाईकचा वैवाहिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

प्रादेशिक परिवहन अधिकारी व सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे आनंद तांबे अध्यक्ष समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान व महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या वतीने आभार मानण्यात आले.