शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर जवळपास 41 दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहुर्त मिळाला असून, आज सकाळी 11 वाजता राजभवन येथे शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यात 18 मंत्री शपथ घेण्याची शक्यता असून, शिंदे गटातील सात तर, भाजपकडून 11 जणांची मंत्रीपदी वर्णी लागणार आहे. त्यातील 9 जणांची नावं भाजपकडून जवळपास निश्चित झाली असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यसह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.

आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात शिंदे गटाकडून उदय सामंत, दादा भुसे, संजय शिरसाठ, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, भरत गोगावले, शंभूराज देसाई आदींना मंत्रीपद मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तर, भाजपकडून 11 जण शपथ घेणार आहेत यामध्ये चंद्रकांत पाटील, राधा कृष्ण विखे पाटील, सुधीर मुनंगटीवार, गिरिष महाजन, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगल प्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित आदी नऊ नावं निश्चित झाली आहेत. उर्वरित दोन नावांमध्ये एक महिला आमदार शपथ घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.

अधिक वाचा  महायुती 2.0 नव्या मंत्र्यांचा शपथविधी 11 डिसेंबरला?; ‘या’ खात्यासाठी तिघांच्याही या नेत्यांची रस्सीखेच

माधुरी मिसाळ यांना संधी

शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात पहिल्या टप्प्यात भाजपच्या दहा आमदारांचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्यात भाजपच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पाटील, मुनगंटीवार, महाजन, विखे-पाटील, लोढा यांना शपथ घेण्याचा निरोप पक्षश्रेष्ठींकडून आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर खाडे, सावे हेही मंत्रिमंडळात राहणार आहेत. महिला आमदारांत पुण्यातील माधुरी मिसाळ यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.

प्रदेशाध्यक्षपदी शेलारांचे नाव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नांदेड दौऱ्यावर जाणार असतानाही तो काही तासांसाठी पुढे ढकलून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी शिंदे सोमवारी सकाळीच शिंदे यांच्या ‘नंदनवन’ बंगल्यावर जाऊन भेट घेतली. सध्याचे राजकीय नाट्य, फोडाफोडीचे राजकीय परिणाम, भविष्यात सत्ताधारी विरोधकांतील संघर्ष या बाबींना प्राधान्य देऊन मंत्र्यांची निवड करण्याची भूमिका या बैठकीत घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

अधिक वाचा  आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

फडणवीसांकडे वजनदार खाती?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदापासून लांब ठेवल्यानंतर त्यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी असेल, यावरून अंदाज वर्तविणे सुरू होते. फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थ खात्याची जबाबदारी येण्याची दाट शक्यता आहे. वजनदार खाती फडणवीस यांच्याकडे ठेवून एक प्रकारे सरकारवरच ‘कंट्रोल’ ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.