राज्याची सांस्कृतिक राजधानी पूणे… विद्येचे माहेरघर…. क्रांतीज्योती महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये पुरोगामी विचाराची बांधणी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीत पुण्यनगरीत वारजे भागातील सुसंस्कृत नेतृत्व सौ.दिपाली प्रदीप बाबा धुमाळ यांना विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर तेवढ्याच सक्षम सांस्कृतिक आणि वैचारिक पातळीच्या कसोटीवरती पुणे शहरातील एका भक्कम विरोधी पक्षाची भूमिका या सावित्रीच्या देखील आपल्या खांद्यावरती सांभाळत उत्कृष्ट माजी विरोधी पक्षनेत्या.. ही आपली वैचारिक बांधणी सिद्ध केली. नव्या वाटचालीसाठी पुन्हा सज्ज असल्याचे संकेत पदोपदी सौ.दिपाली प्रदीप बाबा धुमाळ यांच्याकडून मिळत असतात. पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर सुरुवातीलाच २००२ मध्ये वारजे माळवाडीत धुमाळ दाम्पत्याला काम करण्याची संधी मिळाली. या संधीचा फायदा घेत त्यांनी प्राथमिक सोयी सुविधा यांना महत्त्व देत या भागाचा कायापालट करण्याचे काम केले. कामावर असलेली अतोनात निष्ठा आणि मितभाषा या जोरावर आजही वारजे भागांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना एक आपल्या हक्काचं ठिकाण म्हणून याच दाम्पत्याचा पर्याय वाटतो.
बदलत्या सांस्कृतिक वारजे माळवाडीत होय वारजे बदलतयं…… या अनोख्या आणि प्रेरणादायी टॅग लाईन खाली अनेक सोयी सुविधा देत असताना दिपाली प्रदिप धुमाळ विरोधी पक्षनेत्या व नगरसेविका वनविभागाच्या 35 एकर जागेमध्ये भव्य संजिवन उद्यान नियोजित व अभिमानास्पद प्रकल्प ठरणार आहे. याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार, संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भूमिपूजन झाले असून या प्रकल्पामुळे वारजे माळवाडीला नवीओळख निर्माण होण्यास मदतच होणार आहे. नागरिकांना योग्य आरोग्य सुविधा मिळण्यासाठी सर्व सुख सोयींचे रुग्णालय, क्रीडांगण, बचत गटांसाठी हक्काचे व्यासपीठ अशा विविध उपक्रमांनी दिपालीताई धुमाळ परिसराचा सखोल विकास करण्यासाठी काम करत आहेत. खासदार सुप्रियाताई सुळे व धडाडीचे नेते अजित पवार यांचा लाभलेला आशीर्वाद व विचारसरणीवरच आज या दांपत्याची वाटचाल चालू असून सामान्य कुटुंबातील समाजहितवादी कार्य अनेकांना आपलेसे वाटत आहे.
वारजे माळवाडीचा विकास करण्यासाठी या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व चारही नगरसेवक काम करत असताना अनेक वेगवेगळ्या कल्पना राबवल्या जात आहेत.
सामाजिक राजकिय पातळीवर केलेल्या कार्याची दखल……
होय वारजे बदलतयं….. संजिवन उद्यान! आणखी नवी अभिमानास्पद भर
https://www.newsmaker.live/archives/50565
वारजे बदलतेय….; क्रिडा संकुल व क्लब हाऊसही लवकरच सूरू होणार https://www.newsmaker.live/archives/59702
विकासाभिमुख प्रकल्प वारजेतील नगरसेवक विरोधी बाकावर असूनही करतात -जयंत पाटील
https://www.newsmaker.live/archives/55177
पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारींच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता मोहीम; ४४५४ स्वयंसेवकचा सहभाग
https://www.newsmaker.live/archives/64897
आधी ठेकेदार ठरवून महापालिका दावणीला भाजपचा अजब पायंडा; अजितदादा आवर घाला – धुमाळ
https://www.newsmaker.live/archives/46818
‘जागतिक योग दिन’ औचित्याने कायमस्वरूपी योग वर्गाचा वारजे परिसरात शुभारंभ
https://www.newsmaker.live/archives/67582
सर्वाधिक फायद्याची शहरी गरीब योजना गुंडाळण्याचा भाजपाचा घाट – दिपाली धुमाळ
https://www.newsmaker.live/archives/47536
शहराच्या संस्कृतीला न शोभणारे भाजपचे राजकारण – दिपाली धुमाळ https://www.newsmaker.live/archives/36659
समान पाणीपुरवठाच्या मनमानी ठेकेदारांचा सावळा गोंधळ – दिपाली धुमाळ
https://www.newsmaker.live/archives/49979
केतकी सारख्या वाईट प्रवृत्तींचा बीमोड आवश्यक – दिपाली धुमाळ
https://www.newsmaker.live/archives/64832
वारज्यात वार्डन नेमणूक करून वाहतुक कोंडी सोडवा; दिपाली धुमाळ यांची मागणी
अशा विविध विषयांना वाचा फोडण्याचे काम प्रदीप धुमाळ व दिपालीताई धुमाळ या दाम्पत्यांकडून वारजे भागातील सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र कार्य केले जात आहे. कोणतीही पार्श्वभूमी नसताना फक्त वैचारिक बांधणी आणि समाजसेवी भूमिका यावरती या दांपत्याची सध्या वारजे भागात वाटचाल असून अनेक सर्वसामान्य लोकांना हे दाम्पत्य आपलेसे वाटत असल्याने त्यांच्याकडे वारंवार लोकांचा राबता पाहण्यास मिळतो.