सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नत्त उर्फ केके यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन. ते ५३ वर्षांचे होते. कोलकता येथे एका कार्यक्रमाच्या दरम्यान ही घटना घडली. आज (मंगळवारी) कोलकाता येथील नझरूल मंच येथे केके यांचा गाण्याचा कार्यक्रम होता. परफॉमन्स संपल्यावर केके यांना कार्यक्रमस्थळीच हृदय विकाराचा झटका आला. त्यांना तातडीने कोलकाता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट येथे नेण्यात आले. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी केके यांना मृत घोषित केले. केके यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

23 ​​ऑगस्ट 1968 रोजी दिल्ली येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांना केके म्हणूनच जास्त ओळखलं जायचं. केके यांनी हिंदीत जवळपास २०० हून अधिक गाणी गायली आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील ‘तडप तडप…’ गाण्याने त्यांना बाॅलीवूडमध्ये ओळख मिळवून दिली होती. त्यांचा ‘पल’ म्युझिक अल्बम गाजला होता. ओम शांती ओम, गँगस्टर, दस अशा अनेक सिनेमासाठी त्यांनी गाणी गायली आहेत. फक्त हिंदीच नाही तर तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, आसामी आणि गुजराती भाषेतील चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.

अधिक वाचा  माझं तिकीट राज्यानं नव्हे देशानं ठरवलं; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वपक्षियांचा टोला?

दिल्ली येथे एका मल्याळी कुटुंबात जन्मलेल्या केके यांचं शिक्षण सेंट मेरी शाळेत झालं. लहानपणी डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या केके यांनी काही काळ एका हॉटेल मध्ये नोकरी देखील केली. सोबत गायनाचा छंद देखील जोपासला. याच छंदाचं रूपांतर पुढे करियरमध्ये केलं. दिल्लीहुन मुंबईला आल्यावर लेस्ली लुईस, रणजित बारोट यांच्याकडे त्यांनी गायनाची ऑडिशन दिली. त्यांनी केके यांना जाहिरातीसाठी जिंगल्स गाण्याची संधी दिली. जवळपास ३५०० जिंगल्स गायल्या नंतर त्यांना सिनेमात गाण्याची संधी मिळाली. लेस्ली लुईस यांना तेव्हापासून ते आपला गुरु मानायचे. पुढे ए आर रहमान पासून ते प्रीतम अशा विविध स्टाईलच्या संगीतकारांसोबत त्यांनी काम केलं. स्क्रीनपासून अनेक अवॉर्ड त्यांना मिळाला होता. 1999 च्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारतीय क्रिकेट संघासाठी त्यांनी गायलेले “जोश ऑफ इंडिया” हे गीत आजही अनेक जण विसरू शकत नाहीत.

अधिक वाचा  राजकीय पक्षांच्या खर्च नियंत्रणाची सर्व नियमावली ठरली; प्रचारक माणसांचा ‘रेट’ नाश्ता जेवण मंडप होर्डिंगचे हे दर

केके यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. गायक अदनान सामी यांनी केके यांचं निधन वेदनादायी असल्याचं म्हटलंय. तर राहुल वैद्य याने ट्विटमध्ये म्हटलंय, केके यांचं निधन झाल्याचं मला आत्ताच समजलं. देवा, हे काय सुरूये. केके सर चांगले व्यक्ती होते. ५३ वर्षीचं त्याचे निधन होणं हे धक्कादायक आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रात्री उशिरा ट्विट करून केके यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, “प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ यांच्या अकाली निधनाने दु:ख झाले, जे के.के. त्याच्या गाण्यांमध्ये सर्व वयोगटातील लोकांमध्‍ये विविध प्रकारच्या भावनांचे प्रतिबिंब दिसून आले. त्यांच्या गाण्यातून आम्ही त्यांची आठवण कायम ठेवू. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या संवेदना. ओम शांती”