साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा’ची क्रेझ चाहत्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या डोक्यातून आजतागायत उतरलेली नाही. बॉक्स ऑफिस ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाने भरपूर कमाई केली आहे. चित्रपटाच्या प्रत्येक डायलॉगपासून ते गाण्यांपर्यंत सर्वच गोष्टींच भूत प्रेक्षकांच्या डोक्यावर चढलं होत. त्यावर जोरदारपणे रील्स बनवल्या जात होत्या. एवढेच नाही तर या चित्रपटात पुष्पाची भूमिका साकारणाऱ्या अल्लू अर्जुनचा अभिनय देशासह परदेशातही पाहायला मिळाला. टीव्ही सेलेब्सपासून ते खेळाडूंपर्यंत सर्वजण ‘मैं झुकेगा नहीं साला’वर स्टाईल मारताना दिसले.

या चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चाही बऱ्याच दिवसांपासून सुरू होती, त्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भागही प्रदर्शित होणार असल्याचे स्पष्ट झाले, ज्याचे शूटिंग सध्या सुरू आहे. हा दुसरा भाग पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक दिसत आहे. त्याचवेळी सध्या ‘पुष्पा २’ चित्रपटाची रिलीज डेट लीक झाल्याच्या बातम्या येत आहे. ‘पुष्पा २’ ची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे.

अधिक वाचा  ..तर या गोंधळात पडू नका..अन्यथा अडकून पडाल, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या या चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार हे जाणून घेण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी प्रदर्शनाची तारीख जाणून घेणे ही बातमी एक चांगली बातमी असेल. चित्रपटातील एका अभिनेत्याने त्याच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत खुलासा केला आहे. ‘पुष्पा’मध्ये कॉमेडियन भूमिका साकारणारा सुनील याने चित्रपटाविषयी मीडियाशी संवाद साधला, त्यादरम्यान त्याने सांगितले की ‘पुष्पा २’ या वर्षाच्या शेवटी म्हणजे २०२२ च्या शेवटी प्रदर्शित होईल.

होय, सुनीलने या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे संपूर्ण श्रेय सुकुमार आणि अल्लू अर्जुन या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना दिले आहे, कारण त्यांनी या भूमिकेसाठी त्याच्यावर विश्वास ठेवला होता. या चित्रपटाबद्दल बोलताना सुनीलने सांगितले की, तो ‘पुष्पा २’ मध्येही दिसणार आहे. त्याचवेळी, समोर आलेल्या बातम्यांवर विश्वास ठेवला तर, सध्या चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार चित्रपटाच्या दुसऱ्या स्क्रिप्टवर काम करत आहेत.

अधिक वाचा  एकनाथ शिंदेंचे 'मूळ पक्ष' दर्जासाठी प्रयत्न; 'धनुष्यबाण' मिळवण्यास कायदेशीर लढाई सुरू होणार

दिग्दर्शक सुकुमार यांना असे संवाद चित्रपटात ठेवायचे आहेत जे पुन्हा एकदा प्रेक्षकांना चित्रपटाशी बांधून ठेवू शकतील. ‘पुष्पा’चे यश पाहता निर्मात्यांनी पुढच्या भागाचे बजेट वाढवण्याचाही विचार केला आहे. पहिल्या भागावर १९४ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते, तर आता असे सांगण्यात येत आहे की यावेळी निर्माते ४०० कोटींच्या आसपास पैज लावण्याच्या मूडमध्ये आहेत.

तसेच, यावेळी अल्लू अर्जुन पार्ट २ साठी त्याची फी देखील वाढवू शकतो. यावेळी तो या चित्रपटासाठी १०० कोटी रुपये मानधन घेणार आहे. त्याच वेळी, दुसऱ्या भागात अल्लू अर्जुन पोलिसाची भूमिका साकारणाऱ्या फहाद फाजिलशी भिडणार आहे, ज्याची व्यक्तिरेखा भाग १ मध्ये अतिशय उग्र दाखवण्यात आली होती. त्यांच्या शत्रुत्वाची सुरुवात ‘पुष्पा’ चित्रपटाच्या शेवटी दाखवण्यात आली, जी ‘पुष्पा २’ मध्ये शिखरावर पोहोचणार आहे. त्याच वेळी, पहिल्या भागाप्रमाणे अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचा भाग २ देखील थिएटरमध्ये आपली जादू चालवण्यास सक्षम असेल की नाही हे पाहणे बाकी आहे.