आळंदी : येथील पुरातन पवित्र अस्तित्वातील जलकुंड यांचे जतन आणि संवर्धन तसेच जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे.या उपक्रमाची सुरुवात पुरातन भागीरथी कुंड येथून पुन्हा सुरू करण्यात आली आहे अशी माहिती मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली. आळंदी येथील भागीरथी कुंड संवर्धन, जल स्त्रोत जतन करण्याचे कार्य सेवाभावी संस्था आणि व्यक्ती यांच्या नियमित पाठपुराव्याने आळंदी नगरपरिषदेने हाती घेतले आहे.

येथील जलतिर्थ भागीरथी कुंड आळंदीत पुनरुज्जीवनसाठी सेवाभावी संस्था, व्यक्ती आणि आळंदी नगरपरिषद यांचे माध्यमातून काम सुरू करण्यात आले आहे. यात अखिल विश्व गायत्री परिवार संस्था चे सदस्य व जलदेवता सेवा अभियानचे संस्थापक शैलेंद्र पटेल, आळंदी जनहित फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, देहू येथील रान जाई प्रकल्पचे सोमनाथ आबा मसुडगे, बाळासाहेब चौधरी, प्रल्हाद भालेकर यांनी समन्वय साधून सेवाभावी संस्था आणि आळंदी नगरपरिषद यांचे माध्यमातून भागीरथी कुंड विकास कार्य सुरू केले आहे. आळंदीतील भागीरथी कुंडाचे पावित्र्य जोपासण्यासाठी लगतचा परिसर बंधिस्त करण्याची गरज व्यक्त होत होती.यासाठी सेवाभावी संस्थांनी आळंदीतील पुरातन कुंडाचे जलस्रोत जतनास पुढाकार घेतला आहे.

अधिक वाचा  शिवतारेंची शरद पवार- अजित पवारांवर जहरी टीका; म्हणाले, एक राक्षस तर दुसरा…

जलदेवता सेवा अभियानचे संस्थापक शैलेंद्र पटेल यांनी पुणे माबी, गायत्री परिवार, जलदेवता सेवा अभियान अंतर्गत भागीरथी कुंडातील गाळ उपसा करून जल स्त्रोत पुनरुज्जीवन करण्यास परिश्रम घेतले. यासाठी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव, आरोग्य विभाग प्रमुख शीतल जाधव, मुकादम मालन पाटोळे, दत्तात्रय सोनटक्के, बांधकाम विभाग प्रमुख संजय गिरमे, सचिन गायकवाड, अमोल खैरे, ॲड.आकाश जोशी, आळंदी जनहित फाऊंडेशनचे अर्जुन मेदनकर, गजानन गांडेकर, राहुल कुऱ्हाडे, कार्तिक तापकीर आदींनी सहकार्य केले. प्रथम कुंडातील पाणी उपसा करून कुंड तळापासून गाळ काढून स्वच्छ करण्यात आला.यामुळे पुरातन भागीरथी कुंड जलस्त्रोत जतन होण्यास मदत झाली.

अधिक वाचा  महाराष्ट्र हादरणार! ठाकरेंना अटक करण्याची तयारी सुरू? महाराष्ट्र भाजपची उद्धव ठाकरेंनाही घेरण्याचे संकेत

भागीरथी कुंडा लगत असलेला रहदारीचा मार्ग खचल्याने येथे मजबुतीकरण आणि कूंडाचे संवर्धन आळंदी नगरपरिषद यांचे सहकार्याने सुरू करण्यात आले आहे.या विकास कामाची पाहणी मुख्याधिकारी अंकुश जाधव,कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकासे,शकुर हकीम यांनी केली.यावेळी ॲड.नाझीम शेख,निसार सय्यद,मनोहर गोडसे आणि टीम आदी उपस्थित होते.

भागीरथी कुंड परिसर स्वच्छ ठेवून जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यास सहकार्य करण्याची ग्वाही मुख्याधिकरी अंकुश जाधव यांनी यावेळी दिली.या कुंडातील गाळ, कचरा आरा मशीन लावून काढण्यात आला. परिसरातील झाडे,झुडपे काढण्यात आली आहेत.यामुळे कुंडाचे पावित्र्य जपता आले आहे.कुंड परिसरातील व्यापारी, नागरिकांनी या भागात स्वच्छता कायम रहावी यासाठी कचरा या भागात न टाकता आळंदी नगरपरिषदेच्या घंटा गाडीत सुपूर्द करावा असे आवाहन जलदेवता सेवा अभियानचे प्रमुख शैलेंद्र पटेल यांनी केले आहे.