करण जोहर बॉलिवूडच्या यशस्वी दिग्दर्शक आणि निर्मात्यांमध्ये गणला जातो. नुकताच करणनं ५० वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या या वाढदिवसाच्या पार्टीला बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. करण जोहरच्या ५० व्या वाढदिवशी अनेक कलाकारांनी त्याच्या सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. यात सोलापूरचा मराठमोळा दिग्दर्शक अक्षय इंडीकरचाही समावेश आहे. अक्षयनं करण जोहरच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेली फेसबुक पोस्ट आता चांगलीच चर्चेत आहे. कारण याच पोस्टमधून अक्षयनं तो करण जोहरसोबत काम करणार असल्याची माहिती दिली.

करण जोहरच्या ५० व्या वाढदिवशी अक्षय इंडीकरने त्याच्यासाठी खास पोस्ट लिहून त्याला शुभेच्छा दिल्या. यासोबतच लवकरच तो करण जोहरसोबत काम करणार असल्याची गोड बातमीही शेअर केली. अक्षय इंडीकरची ही फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यानंतर अनेक युजर्सनी कमेंट करत अक्षयवर कौतुकाचा वर्षाव केला आहे तसेच त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

अधिक वाचा  थेट ठाकरेंच्या खुर्चीलाच आव्हान देणाऱ्या एकनाथ शिंदेंची ही कहाणी.. आता नवा इतिहास घडवतायेत

दरम्यान अक्षय इंडीकरच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याने आतापर्यंत ‘उदाहरणार्थ नेमाडे’, ‘त्रिज्या’, ‘स्थलपुराण’ या चित्रपटांसाठी दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांच्या माध्यमातून अक्षयने आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटांची आणि सोबतच स्वतःची देखील वेगळी ओळख निर्माण केली आहे.