बीड: अखिल भारतीय मराठा महासंघातून सामाजिक चळवळीच्या माध्यमातून राजकारणात गेलेले शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे पाच वेळा विधान परिषदेचे सदस्य राहीले. अपवाद वगळता १९९५ पासून ते विधान परिषदेचे सदस्य असून एवढा काळ सदस्य असणारे ते एकमेव आहेत. आता त्यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपत असल्याने त्यांच्या विक्रमात आणखी सहा वर्षांची भर पडणार का, हे पहावे लागणार आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, प्रसाद लाड, भाजपच्या कोट्यातून असलेले शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे आदींची विधान परिषदेतील सदस्यत्वाची मुदत संपत आहे. त्यामुळे पुढच्याच महिन्यात नव्या सदस्यांच्या निवडीसाठी निवडणुकाही होत आहेत. विधान सभा आमदारांतून निवडुण द्यायच्या विधान परिषदेतील सदस्यांमध्ये भाजपचे चार सदस्य निवडुण येतात. त्यामुळे भाजप कोणाला संधी देणार, याचा खल पक्षपातळीवर सुरु आहे.

अधिक वाचा  महायुती-मविआसाठी ‘या’ जागा डोकेदुखी का ठरल्यात?घराणेशाही, राजकीय जातीय समीकरणे अजूनही गुंताचं!

यात महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांचेही नाव पुन्हा आघाडीवर आहे. भाजपकडून त्यांना पुन्हा संधी मिळेल अशी शक्यता आणि त्यांच्या समर्थकांना तेवढाच विश्वासही आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी मेटेंची असलेली जवळीक पाहता फडणवीस पुन्हा संधी देतील असे बोलले जाते.

राजकीय चित्र पाहता महायुतीमधील घटक पक्षांपैकी स्वाभिमानी अगोदरच बाहेर पडलेला असून स्वाभिमानी व राजू शेट्टी यांना चेक देण्यासाठी यापूर्वीच सदाभाऊ खोत यांना आमदारकी व मंत्रीपदही दिलेले आहे. तर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले केंद्रात मंत्री आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरही भाजपासून दुरावलेले आहेत आणि भाजपने पडळकरांना संधी देऊन त्यांनाही चेक दिलेला आहे.

अधिक वाचा  हार्दिक परत गेल्यानंतर जीत समोरील आव्हानं कोणती? सर्वाधिक चिंता ‘या’ गोष्टीची!

त्यामुळे सध्या केवळ शिवसंग्राम भाजपच्या जवळ आहे. मराठा आरक्षणासह इतर विषयांवर आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांची बाजू लाऊन धरण्यात विनायक मेटेंनी कायम आघाडी घेतली. त्यात मागच्या महायुती सरकारच्या काळात मेटे वगळता सर्वच घटकपक्षांच्या ताटात मंत्रीपदाचा घास पडला. विशेष म्हणजे त्यांना बीडची उमेदवारीही दिली नव्हती आणि निवडणुकीत त्यांच्या पक्षाला स्वत:च्या चिन्हावर एकही जागा मिळाली नव्हती. या सर्वांची कसर आता फडणवीस या विधान परिषदेच्या निमित्ताने भरून काढणार असल्याचे त्यांच्या समर्थकांना विश्वास आहे. दरम्यान, मुंबईत पहिल्यांदाच शिवजयंतीचे आयोजन आणि त्यात फडणवीसांची असलेली प्रमुख उपस्थिती. यातूच विनायक मेटे यांच्या विधान परिषदेची पायाभरणी झाल्याचे बोलले जाते. दरम्यान, यापूर्वी विनायक मेटे पहिल्या युती सरकारच्या काळात विधान परिषदेवर गेले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीने त्यांना दोन वेळा संधी दिली.

अधिक वाचा  ‘बडे मिया छोटे मिया’ च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान अक्षयनं टायगरला दिला ‘हा’ सल्ला, ऐकताच सगळ्यांना हसू अनावर

२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपची साथ दिली. त्यावेळीही पक्षांतरामुळे त्यांची गेलेली आमदारकी भाजपने दिली होती. तर, मागच्या वेळीही त्यांना भाजपने संधी दिली होती. एकूणच विधान परिषदेचे सदस्यत्वाच्या कालावधीचा विक्रम करणाऱ्या विनायक मेटे यांच्या विक्रमात देवेंद्र फडणवीस आणखी सहा वर्षांची भर घालतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.