पुणे महानगरपालिका कामगार युनियन ( मान्यताप्राप्त) ही संलग्न असल्याने पुणे शहरात कंत्राटी पद्धतीने सफाईमध्ये काम करणाऱ्या सहा हजार सफाई कामगार देशव्यापी स्वाभिमान जागृती अभियानामध्ये सहभागी होणार आहेत. सदर स्वाभिमान अभियान हे इंडियन म्युनिसिपल वर्कर्स फेडरेशनच्या वतीने हे संपूर्ण देशभर राबवण्यात येणार आहे. तसेच १५ मे पासून कामाच्या ठिकाणी आपल्या मागण्यांबाबत निदर्शने करण्याच्या आंदोलनापासून सुरुवात होणार आहे तर ३१ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन देशातील कंत्राटी सफाई कामगांराच्या समस्या व मागण्यांचे निवेदन पत्र पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांना सादर केले जाणार आहे.

अधिक वाचा  शिवसेनेत फूट, एकनाथ शिंदे यांचे समर्थक शिवसेनेचे १३ आमदार नॉट रिचेबल

इंडियन म्युनिसिपल वर्कर्स फेडरेशनच्या वतीने संपूर्ण भारतभर सफाईमध्ये कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या

१) सर्व क्षेत्रातील कंत्राटी पद्धत बंद करा.

२) २४० दिवस भरणाऱ्या कंत्राटी सफाई कामगांराना कायम करा.

३) समान कामाला समान वेतन द्या.

४) प्राव्हिडंट फंड, कामगार विमा योजना, अपघात नुकसान भरपाई, घाणीत काम करून मृत्युमुखी पडलेल्या कंत्राटी कामगाराच्या वारसाना नोकरी देणे, मोफत औषध उपचार देणे, वृद्धापकाळात पेन्शन देणे, गणवेश व सुरक्षा साधने द्या. ईत्यादी सामाजिक सुरक्षा देणे.

५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवारा योजने मार्फत कंत्राटी सफाई कामगांराना मोफत घरे देणे. या विविध मागण्याच्या संदर्भात देशव्यापी स्वाभिमान जागृती अभियान दि. १५ मे ते ३१ मे या दरम्यान सुरु करण्यात येणार आहे.

अधिक वाचा  एकनाथ शिंदे समर्थक 13 आमदार नॉटरिचेबल; शिवसेना फुटण्याची शक्यता?

सदर देशव्यापी आंदोलनामध्ये पाठींबा देण्यासाठी पुणे महानगरपालिकेतील कायम कामगार सहभागी होणार आहेत. तरी सुमारे सहा हजार कंत्राटी सफाई कामगांरानी एकजुटीने देशव्यापी स्वाभिमान अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन युनियनचे अध्यक्ष कॉ. उदय भट व जनरल सेक्रेटरी कॉ. मुक्ता मनोहर यांनी केले असे कार्यालयीन चिटणीस कॉ. वैजीनाथ गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली.