घोडेगाव : घोडेगाव (ता. आंबेगाव ) येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेला सन -2021 या वर्षाचे आय.एस.ओ.मानांकन मिळाल्याची माहिती प्राचार्य चंद्रकांत नाईकडे यांनी दिली. आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या घोडेगाव येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेला सन २०२१ या वर्षाचे आय.एस.ओ.मानांकन मिळाले आहे.

इंद्रप्रस्थ सिस्टिम सीसीआरटी प्रा. लि. अहमदनगर या संस्थेचे प्रमुख अनिल येवले यांनी आय.एस.ओ. मानांकन संदर्भात परीक्षण करण्यात आले होते. शाळेतील उत्कृष्ट भौतिक सोयी सुविधा, शाळा व परिसर स्वच्छता, विद्यार्थ्यांना दिले जाणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण, शाळा प्रशासन या गोष्टींचा प्रामुख्याने परीक्षणात महत्वाचा विचार करण्यात आला.या आश्रमशाळेला आय.एस.ओ.मानांकन प्राप्त झाल्याबद्दल घोडेगाव प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप साबळे, माजी अध्यक्ष अशोक शेंगाळे व इतर सदस्य तसेच पालक यांनी प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

अधिक वाचा  महा‘रक्तदान’ शिबीर महिला - नागरिकांच्या उस्फूर्त सहभागाने संपन्न