पुणे : ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी शिवसेनेचे उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे यांची तक्रार ठाकरेंकडे केली आहे. चव्हाण यांच्या शेतजमिनीत बेकायदा घुसून तेथे धनकुडे यांनी खोदाई केल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासह दोघांविरुद्ध उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उषा चव्हाण यांनी पत्रात म्हटलं आहे की, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नपूर्ती झालेल्या राज्यात एखाद्याचे शेतच सुरक्षित राहात नसेल, तर घर तरी कसे सुरक्षित राहील? याची मला काळजी वाटते. बाळासाहेबांनी नेहमीच महिलांचा आदर केला. महिलांना त्रास होऊ नये, याचीही ते नेहमी काळजी घेत. आता माझ्यासारख्या बाळासाहेबांच्या स्नेहपरिवारातील अभिनेत्रीला असा त्रास दिला जातोय. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मावळे असे असूच शकत नाहीत.

अधिक वाचा  महायुती-मविआसाठी ‘या’ जागा डोकेदुखी का ठरल्यात?घराणेशाही, राजकीय जातीय समीकरणे अजूनही गुंताचं!

दरम्यान, याप्रकरणी उषा चव्हाण-कडू यांचे पुत्र ह्दयनाथ दत्तात्रय कडू यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. उषा चव्हाण यांनी 1999 मध्ये हवेली तालुक्‍यातील जांभळी येथे गट साडेसहा एकर जमीन खरेदी केली होती. या जागेवर त्यांच्या कुटुंबातील सदस्य वेळोवेळी पाहणी करुन देखभाल करतात. तसेच, त्यांनी धर्मराज शिवाजी गडदे (वय 33, रा. जांभळी) यांना त्यांच्या जागेतील माळरानावर गायी चारण्यासही परवानगी दिली आहे.

या जमिनीतून लवाहिनी टाकण्यासाठी चर खोदण्याबाबत राजेंद्र धनकुडे यांनी फिर्यादीकडे विचारणा केली होती. त्याला फिर्यादी यांनी विरोध केला होता. जलवाहिनी रस्त्याच्या कडेने करण्याची सूचना त्यांनी केली होती. तरीही या जमिनीवरजेसीबी आणून खोदाई सुरु करण्यात आली. याची माहिती गडदे यांनी फिर्यादी आणि त्याच्या आईला दिली. ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे जमिनीमध्ये खोदकाम केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत उत्तमनगर पोलिसांना माहिती दिली.

अधिक वाचा  गैरविश्वास दाखवला तर ‘हे’ लक्षात ठेवा, पक्षप्रवेशाच्याच दिवशी मोहिते पाटलांचा आढळरावांना मोठा इशारा

पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता जमिनीत 400 फूर लांब, चार फूट रुंद व दोन फूट खोल चर खोदल्याचे आढळले. तसेच त्यांनी वहिवाटीसाठी केलेला रस्ताही उकरुन बंद केल्याचे दिसले. याबरोबरच त्यांच्या जागेतील दगडाच्या ताली, लोखंडी तारेके कुंपण, सिमेंट व लोखंडाच्या खांबांची तोडफोड केल्याचे आढळले. धनकुडे यांनी फिर्यादीची परवानगी न घेता, त्यांच्या जागेत घुसून चर खोदल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.