मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत झालेल्या सभेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. फडणवीस यांनी बाबरी मशीद पाडताना तेथे होतो, या दाव्याची ठाकरे यांनी खिल्ली उडवली. बाबरी पाडली तेव्हा मी, होतो असे देवेंद्रजी म्हणाले. ती तुमच्या काय शाळेची सहल होती काय? तुमचं वय काय तुम्ही बोलता किती. तुम्ही खरच तिथे गेला असता आणि वर चढायचा प्रयत्न केला असता तर तुमच्या वजनाने बाबरी खाली आली असतीे. तुम्ही एक पाय टाकला असता तर बाबरी खाली आली असती. तुमचं वय काय बोलता काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे इतर मुद्दे पुढीलप्रमाणे

-सात पैशांनी पेट्रोल महागले तेव्हा अटल बिहारी वाजपेयी संसदेत बैलागाडीतून गेले होते. आता कुठे गेली तुमची ती संवेदनशीलता. हे म्हणतात शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही. मग ही कुणाची आहे. तुमचा भाजप तरी आता अटलजी व आडवाणींचा राहिला आहे का? –

-आम्ही काँग्रेससोबत गेलो ते उघड गेलो. तुमच्या सारखा पहाटेचा शपथविधी नाही केला. तो पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून बसले असते.

अधिक वाचा  नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही D गँगशी संंबंध का? - सोमय्या

-केंद्र सरकार मराठीला अभिजात दर्जा आजही देत नाही. ही छत्रपती शिवाजी महाराजांची मातृभाषा आहे. छत्रपती नसते तर आज तुम्ही देखील भोंग्यात बसलेले असता. त्या छत्रपतींच्या मातृभाषेला तुम्ही दर्जा देत नाही, असं करंट सरकार केंद्रात बसलं आहे.

-स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. पण हे यांना बघवत नाहीए. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था ठीक नाही असं भासवलं जातंय. झेड सुरक्षा असलेल्या व्यक्तीवर हल्ला झाला हे फोटो दाखवले जातेय. पण त्या व्यक्तीला टॉमेटो सॉस कुणी दिला?

-आमच्यासोबत जी गाढवं होती, अगदी घोड्याच्या आवेशात. त्या गाढवाला लाथ मारून आम्ही बाहेर पडलो आहोत.

-आमचे हिंदुत्व म्हणजे देवळात घंटा बडविणारे नाहीतर अतिरेक्यांना तुडविणारे आहे. ज्यांनी घंटा बुडविल्या त्यांना काय मिळालं घंटा? ज्यांना महाराष्ट्र काय आहे हे कळलं नाही त्यांच्यासाठी बोलावे लागत आहे.

– खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेले पक्ष आपल्या सोबत होता. तो देशाची दिशा बदलत आहे.

– एक मे रोजी झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस हे चुकून खरे बोललो. मुंबई स्वतंत्र करणार, असल्याचे त्यांच्या मालकांचे म्हणणे असल्याचे ते बोलून गेले. पण तुमच्या 1760 पिढ्या आल्या तरी ती तुम्हाला हिरावून घेता येणार नाही. जो कोणी या मुंबईला वेगळा करायचा प्रयत्न करेल त्याचे तुकडेतुकडे केल्याशिवाय राहणार नाही.

अधिक वाचा  भाजपा मोठा चमत्कारीक पक्ष, कशाचा इव्हेंट करतील याच भरवसा नाही

-मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कोणी मागितली? मुंबई स्वतंत्र करणार म्हणजे काय करणार? मुंबई काय पारतंत्र्यात आहे?

शिवसैनिकांसमोर आदित्य ठाकरे नतमस्तक… सभेची मने जिंकली

मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मैदान ( बीकेसी ग्राऊंड ) येथे आज शिवसेनेतर्फे शिवसंपर्क अभियानाची विराट सभा झाली.. या सभेत भाषणासाठी उभ्या राहिलेले शिवसेनेचे युवा नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मैदानात जमलेल्या शिवसैनिकाच्या विराट गर्दीला पाहून भावूक होऊन नतमस्तक झाले. “मला तुमच्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व माझ्या आजी दिसल्या” असे भावोद्गार त्यांनी यावेळी काढले.

आदित्य ठाकरेचे हे रुप पाहून शिवसैनिक भारावून गेले.शिंदेंच्या भाषणानंतर ते भाषण करण्यासाठी उभे राहिले. आदित्य ठाकरेंचे नाव घेताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. शिवसैनिकांच्या या प्रेमाने भावूक होत आदित्य ठाकरे यांनी व्यासपीठाच्या समोरील बाजूस जाऊन गुडघे जमिनीवर टेकवत शिवसैनिकांसमोर नतमस्तक झाले. आदित्य ठाकरे म्हणाले की, नतमस्तक होताना मला तुमच्यात पंचमुखी हनुमान दिसले, मर्यादा पुरूषोत्तम राम, सीता, लक्ष्मण, महादेव दिसले, आपल्यात मला हिंदुह्रद्य सम्राट बाळासाहेब ठाकरे व माझ्या आजी दिसल्या. आम्ही तुमच्या आशीर्वादाने सत्तेत बसलो. आम्ही काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेत दिलेल्या आशीर्वादाने आपले सरकार आले.

अधिक वाचा  "मला संघाने कुलगुरू केले, राज्याने नव्हे"-डॉ. शांतिश्री पंडित

विरोधकांकडून घरे पेटविण्याचे काम… आदित्य ठाकरे

मी 31 वर्षांचा युवा म्हणून तुम्हाला विचारत आहे की, आपल्या देशात व राज्यात अनेक नागरी प्रश्न आहेत. महागाई, बेरोजगारी आहे. समाजात भांडणे लावली जातात. अनेकांनी वेगवेगळे रंग हाती घेतले आहेत. आणि मग तुम्ही कोणती बाजू निवडणार आहात. तुम्ही घर पेटविणाऱ्यांच्या बाजूने आहात की चूल पेटविणाऱ्यांच्या बाजूने आहात. आपण चूल पेटविणारे लोक आहोत. ह्रद्यात राम व हाताला काम हे आपले ब्रिद वाक्य आहे. खरे हिंदुत्व तेच आहे की आम्ही जी वचने घेतो ती पूर्ण करून दाखवितो, असे त्यांनी स्पष्ट केले.