मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ माजली आहे. धारावीमध्ये एका 19 वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार करून दोन व्यक्ती पसार झाले आहेत. यासंदर्भात धारावी पोलिसांकडे बलात्काराचा गुन्हा नोंदवला असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

धारावीत राहत्या घरात अर्धवट उघड्या असलेल्या दरवाजातून दोन अज्ञात व्यक्ती या 19 वर्षीय महिलेच्या घरी घुसल्या. मंगळवारी संध्याकाळी साडेचारच्या आसपास ही घटना घडली. या आरोपींनी बलात्कार करतानाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं असल्याचीही बाब समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अधिक वाचा  बायकोने घटस्फोट न घेताच दुसरे लग्न केले म्हणून नवऱ्याचं उपोषण

पोलिसांमध्ये तक्रार करणारी 19 वर्षीय तरुणी सासरच्या मंडळींसोबत राहते. मंगळवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास तरुणी घरात झोपली होती. त्यावेळी तिच्या सासरच्या मंडळी दरवाजा न लावता घराबाहेर पडली. याचवेळी संधी साधून दोन अज्ञात व्यक्ती घरात घुसल्या.

यावेळी या अज्ञात आरोपींनी चाकूचा धाक दाखवून या महिलेवर बलात्कार केला. यावेळी एकाने या संपूर्ण घटनेचा मोबाइलवर व्हिडीयो तयार केला. आरोपींनी आपली ओळख समोर येऊन नये यासाठी चेहऱ्यावर रुमाल बांधला असल्याचं या महिलेने पोलिसांना सांगितलं आहे.

य दोन्ही अज्ञात व्यक्ती निघून गेल्यानंतर तरूणीने तातडीने पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेल्या घटनेची तक्रार दिली. तरूणीच्या तक्रारीनंतर पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि ओळखीच्या व्यक्तीकडे तपास करतायत.