सध्या मराठी अभिनेत्री केतकी चितळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकली आहे. तिच्या या पोस्टला आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

केतकी चितळे नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत येत असते. सोशल मीडियावर ती अनेक वादग्रस्त पोस्ट किंवा व्हिडीओ टाकत असते. तिनं आता थेट शरद पवार यांच्या विरोधात फेसबुक पोस्ट केली आहे. शरद पवारांच्या शारीरिक व्यंगावरून तिनं टीका केल्यानं सामान्य नागरिक देखील संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

अधिक वाचा  अयोध्येतला ट्रॅप, व्हाया राणा ते अफजल खानाची कबर... राज ठाकरेंच्या भाषणाचे हे मुद्दे

केतकीच्या पोस्टला रुपाली पाटील ठोंबरे यांनी देखील फेसबुक पोस्ट करून प्रतिउत्तर दिले आहे. ‘चि चि चवताळलीस बाई तू, महिला असली तरी छपरीच तू, संस्कार नसलेली केतकी, इतकीशी कशी चवताळलीस,’अशा आशयाची पोस्ट रुपाली पाटील यांनी केली आहे.

तसेच त्यांनी लिहिले आहे, हरामखोर विकृती, मनोरुग्ण तुला चपलेने 100 मारून 1 मोजले पाहीजे. कशात ना मशात केतकीबाई तमाशात, लवकरच जंगी चोपाची गरज आहे हिला, मिळणारच बाई तुला चोप, असे लिहून केतकीवर राष्ट्रवादी महिला आघाडी तुटून पडणार असल्याचा इशारा रूपाली ठोंबरे यांनी दिला आहे.

केतकीने शरद पवारांबद्दल फेसबुक पोस्ट केली की, ‘तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा, ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक सगळे पडले उरले सुळे, सतरा वेळा लाळ गळे,समर्थांचे काढतो माप, ते तर तुझ्या बापाचेही बाप ब्राह्मणांचा तुला मत्सर, कोणरे तू ?…’तिच्या या पोस्टमुळे ती प्रचंड ट्रोल होत आहे.

अधिक वाचा  नवाब मलिक डी गँग प्रकरण : “…त्यामुळे फडणवीस हेसुद्धा तितकेच अपराधी आहेत”

या प्रकरणी केतकीच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याआधी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही तिने वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर ती वादात सापडली होती. त्यावेळीही शिवप्रेमींनी तिला ट्रोल केले होते. आता केतकी पुढचं पाऊल काय उचलते हे पाहणं आवश्यक राहील.