मुंबई: भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या वडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसच्या ठीत खंजीर खुपसला, असा आरोप करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेचीच राष्ट्रवादीने पोलखोल केली आहे. पटोले यांनी भाजपशी आतापर्यंत तीन वेळा सलोखा केला, याची हिती देत राष्ट्रवादीने त्यांची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला आहे.

गोंदिया जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून काँग्रेसने आजपर्यंत राष्ट्रवादीला सत्तेच्या बाहेर ठेवले आहे. त्यात प्रामुख्याने तत्कालीन आमदार अग्रवाल व आमदार नाना पटोले यांचाच हात राहिलेला आहे. जेव्हा जेव्हा या निवडणुका झाल्या तेव्हा तेव्हा सर्व तक्रारी काँग्रेस नेतृत्वाकडे करण्यात आल्या होत्या. परंतु, काँग्रेस पक्षाने कारवाई न करता उलट आमदार अग्रवाल यांना महाराष्ट्र विधान मंडळ लोक लेखा समितीचे अध्यक्षपद देऊन पुरस्कृत केले. आमदार पटोले हे कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतरही गोंदिया जिल्ह्यात भाजप- काँग्रेस पक्षाची युती कायम होती.

अधिक वाचा  बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? कोणते स्पेअर पार्ट घातले होते, मी मेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार..

भंडारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीने २०१५ मध्ये आघाडी करून काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बनविले. त्याच काळात राष्ट्रवादीला बांधकाम विभाग सभापतिपद देण्याचे काँग्रेसने मान्य केले होते; पण आमदार नाना पटोले व काँग्रेस पक्षाने दिलेले आश्वासन पूर्ण न करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धोका दिला विधान परिषद निवडणुकीत ५ वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांच्याविरोधात काँग्रेसने भाजपचे उमेदवार परिणय फुके यांना मतदान करून त्यांना विजयी केले होते.

६ मे २०२२ रोजी काही पंचायत समिती सभापती निवडणुका संपन्न झाल्या. त्यात काँग्रेस पक्षाने तुमसर पंचायत समितीमध्ये भाजपसोबत युती करून भाजपचे सभापती व काँग्रेसचे उपसभापती निवडून आणले. परंतु, या पंचायत समितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन सत्ता स्थापन करू शकत होते. १० मे २०२२ रोजी भंडारा जिल्हा परिषद निवडणूक पार पडली, यामध्येही काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपसोबत युती करून काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष व भाजपचे संदीप टाले यांना उपाध्यक्ष केले, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली.