मुंबई : शिवसेनेची आज मुंबईतल्या बीकेसी मैदानावर विराट सभा होणार आहे. या सभेपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक विधान केलंय. आजच्या सभेत पोटदुखी, जळजळ असणाऱ्यांवर योग्य ते उपचार केले जातील असं संजय राऊत म्हणालेत. शिवसेनेनं या सभेला बुस्टर नाही तर मास्टर डोस असं म्हटलं आहे. करोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीनंतर पहिल्यांदा शिवसेनेने ही सभा आयोजित केली आहे. या सभेला राज्यातनं शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थिती लावतील असा जाणकारांचा होरा आहे.

राज ठाकरेंच्या तीन सभा, त्या सभांमधलं भोंग्याचं राजकारण आणि राज्य सरकारवर राज ठाकरे यांनी केलेली उघड चिखलफेक, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बुस्टर डोस सभा, रवी राणा आणि नवनीत राणा दांपत्याने नुकतीच दिल्लीत केलेली हनुमान चालिसा, मुख्यमंत्री हेच राज्यावरचं संकट आहेत असं म्हणत नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा डिवचण्याचा केलेला प्रयत्न, त्याआधी मुंबईत राणा दांपत्याचा हनुमान चालिसा अंक, किरीट सोमय्या अशा अनेक राजकीय शत्रूंना आज उद्धव ठाकरे आपल्या भाषेत उत्तर देणार आहेत. फडणवीसांनी बुस्टर डोस म्हटल्यावर शिवसेनेनं त्या सभेला उत्तर म्हणून मास्टर डोस अशी केलेली घोषणा, हिंदू जननायक म्हणून शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरेंचं केलेलं संबोधन असे अनेक महत्वाचे पैलू या सभेतनं उलगडताना दिसणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना या सर्व लोकांच्या पोटदुखीवर,जळजळीवर आज योग्य ते उपचार केले जातील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी, दिल्ली पोलिसांत तक्रार