उदयपूर : राजस्थानातील उदयपूरमध्ये शुक्रवारपासून काँग्रेसची तीन दिवसीय ‘नव संकल्प चिंतन शिबीर’ सुरू झाले आहे. या शिबीरामध्ये अनेक संघटनात्मक बदल केले जाण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपुर्वी पक्षाची बांधणी करण्यासाठी हे बदल अपेक्षित असून अखेरच्या दिवशी त्यावर शिक्कामोर्तब केले जाऊ शकते.

चिंतन शिबीराला सुरूवात होण्याआधी पक्षाचे नेते अजय माकन यांनी माध्यमांशी संवाद साधत याबाबतची माहिती दिली. माकन म्हणाले, शिबीरानंतर सर्वात जुन्या पक्षात मोठे संघनात्मक बदल पाहायला मिळतील. ‘एक परिवार एक तिकीट’ हा महत्वाचा प्रस्तावही चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे.

पाच वर्षांसाठी मिळणार पद

अधिक वाचा  पंधरा दिवसापूर्वी शिवसेनेत गेलेले मनसेचे नेते पुन्हा स्वगृही परतणार...

नेत्याच्या कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला तिकीट हवे असेल तर त्याने पक्षात किमान पाच वर्षे काम केलेले असावे. तसेच पक्षात कोणत्याही पदावर एखादी व्यक्ती जास्तीत जास्त पाच वर्षे राहू शकेल. पुन्हा त्याच पदावर त्यांची नियुक्ती करायची असल्यास तीन वर्षे वाट पाहावी लागेल. हा ठरावही शिबीरा मांडला जाणार आहे.

मंडल समित्या स्थापन करण्याचा प्रस्ताव

काँग्रेसमधील सर्वात खालचा स्तर हा बूथ समिती असते. ब्लॉक समितीच्या खाली बूथ समित्या येतात. पण आता या दोन्ही समित्यांच्यामध्ये मंडल समिती बनवण्याचा प्रस्ताव आहे. प्रत्येक मंडल समितीमध्ये 15 ते 20 बूथ असतील. याला सर्वांची संमतीही आहे, असं माकन यानी सांगितले.

अधिक वाचा  घोडेगाव शासकीय आश्रमशाळेला ISO मानांकन

पदाधिकाऱ्यांच्या कामाचे होणार परीक्षण

पक्षातील पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या किंवा करत असलेल्या कामाच परीक्षण केले जाणार आहे. त्यासाठी पक्षात असेसमेंट विंग निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. चांगले काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बढती मिळावी आणि काम न करणाऱ्यांना हटविले जावे, यासाठी हा प्रस्ताव असल्याचे माकन यांनी स्पष्ट केले.