पुणे – सिंहगडावरून  पायथ्याला येत असताना ‘पीएमपी’च्या ई-बसचा  अपघात  झाला. घाटातील वळणांवर चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने बस कठड्याला धडकली. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. पीएमपी प्रशासनाने घटनेची गंभीर दखल घेतली. शुक्रवारीच ओलेक्ट्रा कंपनीला नोटीस दिली. चालकांना घाटात बस चालविण्याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

तीन दिवसांत ‘पीएमपी’च्या दोन बसचा अपघात झाल्याने प्रवासी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रवाशांना घेऊन बस पायथ्याला येत असताना शुक्रवारी (ता. १३) दुपारी साडेबाराच्या सुमारास चालकाचा स्टेअरिंगवरचा ताबा सुटला आणि वळणावरच्या कठड्याला धडकली, त्यावेळी गाडी थांबली. बसमधील प्रवाशांना व चालकाला कोणतीही इजा झालेली नाही. नंतर बस प्रवाशांना घेऊन सुखरूपपणे खाली आली.

अधिक वाचा  राज्यात तब्बल ६७४ शाळा अनधिकृत त्यात पुण्यातील २२ शाळांचा समावेश

घाटात चार ठिकाण धोक्याचे..

सिंहगडच्या घाटात चार ठिकाणे ही धोक्याची आहेत, असे वन विभागाच्या पाहणीत आढळले आहे. तत्काळ त्याची दुरुस्ती करण्याचे वन विभागाने ठरविले आहे. बस ज्या कठड्याला धडकली, तो घाटातील पहिला वळण होता. तो सर्वांत जास्त शार्प वळण आहे, त्यामुळे वन विभाग त्या ठिकाणचा रस्ता मोठा करणार आहे.

चालकांना विशेष प्रशिक्षण..

सिंहगडच्या घाटात बस चालविण्यासाठी ज्या चालकांची सेवा १० वर्षांपेक्षा जास्त आहे, अशाच चालकांची नियुक्ती केली आहे. मात्र, या चालकांना घाटात बस चालविण्याचे प्रशिक्षण नाही. तेव्हा ही अडचण लक्षात घेऊन पीएमपी प्रशासन या मार्गावरच्या चालकांना ‘सीआयआरटी’च्या मार्फत बस चालविण्याचे विशेष प्रशिक्षण देणार आहेत. त्या संबंधी लवकरच ‘सीआयआरटी’मार्फत प्रशिक्षणाचा कालावधी जाहीर होईल.

अधिक वाचा  संभाजीराजेंची पुरती कोंडी?; राजेंच्या हाती केवळ काही तासचं?

वन विभागाने घाटातील रस्त्याची पाहणी करून चार स्पॉट शोधून काढले आहेत. त्याची तत्काळ दुरुस्ती होणे गरजेचे आहे. त्यानुसार वन विभाग सुरक्षित प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक त्या ठिकाणी कामे करणार आहे.ई-बस चालकांना घाटात बस चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे प्रवासी वाहतूक सुरक्षित होण्यास मदत मिळेल. तसेच, मार्गात रस्त्याची देखील कामे केली जाणार आहे.