उमटे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक मित्रमंडळ उमटे व सावित्रीबाई फुले महिला मंडळ उमटे यांच्या संयुक्त विद्यमाने “तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर” यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन उमटे (बौद्धवाडी) गावात गुरुवार दि. १९ मे २०२२ रोजी करण्यात आले आहे. सकाळी ८:३० ते रात्री ९:०० या वेळेत पंचशील धम्मध्वजारोहन, बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना व धार्मिक विधी, धम्मदेसना, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, धम्मरॅली व मनोरंजनात्मक कव्वाली सामना अशी कार्यक्रमाची रूपरेषा असून श्री. करंजाई मित्रमंडळ उमटे, जय भवानी मित्रमंडळ उमटे, श्रीनगर, श्री. कृष्णाई मित्रमंडळ गोपाळपूर यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्याची धुरा सांभाळली आहे. तसेच उपस्थितांचे मनोरंजन व्हावे याकरता सुदर्शन कासारे आणि पार्टी तसेच दीपाली शिंदे आणि पार्टी यांच्या मनोरंजनात्मक कव्वाली सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक वाचा  अभिनेता पुष्कर जोग यांच्या आईवर पुण्यात गुन्हा दाखल, शिक्षण क्षेत्रात खळबळ

सदर कार्यक्रम हा समाजातील सर्वच स्तरातील लोकांनी एकत्र येऊन त्यांच्यातील सामाजिक बांधिलकी अजून दृढ व्हावी तसेच कामधंद्यानिमित्त मुंबई व इतर शहरात स्थायिक झालेल्या गावकीतील लोकांनी “एक दिवस गावासाठी” या विचाराने गावात येऊन गावासोबत असलेली आपली नाळ टिकवावी या निर्मळ भावनेतून आयोजन करण्यात येत आहे तरी सर्वांनी जास्तीतजास्त संख्येत उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक मित्रमंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.