शिवसेनेवर मागच्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले, निवडणूक आणि पक्षीय राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून काहीसे दुर गेलेले शिवसेना नेते रामदास कदम पुढच्या काहीच दिवसात पक्षात जोरदार कमबॅक करण्याची शक्यता आहे. काल खेड येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमादरम्यान नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कदम यांना पक्षाच्या वतीने दिलेल्या खास मेसेजवरुन याबाबतचे संकेत मिळत आहेत.

काल खेडमध्ये ‘जागर कदम वंशाचा’ या पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानाहून एकनाथ शिंदे बोलत होते. ते रामदास कदम यांना म्हणाले, “रामदास भाई तुम्ही आता केवळ साहित्यिक बनू नका, बाळासाहेबांच्या काळातील तुम्ही फायरब्रॅन्ड नेते आहात. तुमची आम्हाला, समाजाला आणि विधिमंडळातील युवा पिढीला गरज आहे. अनेक कठीण प्रसंगात पक्षासाठी झोकून तुम्ही काम केले आहे. तुम्ही डोक्यात काही ठेवू नका, सेकंड इनिंग जोरदार सुरू करा, तुम्ही पुन्हा सक्रिय व्हावे अशी आमची इच्छा आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

अधिक वाचा  जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मान्यता~मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, ‘भाई तुम्ही आम्हाला ज्येष्ठ आहात. तुमच्याकडून आम्हाला सदैव प्रेरणा मिळते. त्यामुळे तुम्ही विधिमंडळात येत चला. आम्हाला तुमचा नेहमीच आधार वाटतो.’ कार्यक्रमाला शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर, शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार योगेश कदम असे सर्व जण वरिष्ठ नेतेमंडळी उपस्थित होते. या नेतेमंडळींसमोर एकनाथ शिंदे यांनी खास मेसेज दिल्याने रामदास कदम यांचे शिवसेनेत जोरदार कमबॅक निश्चित असल्याचे संकेत मिळत आहेत.

सभेचे निमंत्रण पण…

रामदास कदम म्हणाले, मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप मिळाला. मला १४ मे च्या शिवसेनेच्या सभेचे बोलावणे आले आहे. पण या सभेला मी उपस्थित राहणार नाही. कारण, आमच्या ग्रामदैवतेच्या उत्सवाला मला उपस्थित राहवे लागणार आहे. मात्र, त्यानंतर मी स्वतः मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  महापालिका प्रभाग आरक्षण सोडतीची तारीख ठरली; OBC आरक्षणाशिवाय सोडती होणारं

सभेचे बोलावणे आले आहे. पण या सभेला मी उपस्थित राहणार नाही. कारण, आमच्या ग्रामदैवतेच्या उत्सवाला मला उपस्थित राहवे लागणार आहे. मात्र, त्यानंतर मी स्वतः मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.