मुंबई :अलिकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विषयी भाजपने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत ते हिंदूंच्या विरोधात असल्याचं आरोप केला होता. शरद पवार यांच्यावर हे आक्षेपार्ह ट्विट केल्याचा दावा आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. त्याचवेळी आता राष्ट्रवादी काँग्रेस भाजपवर कायदेशीर लढाई करण्याचा इशारा दिला आहे.

भाजपने मागावी पवारांची माफी
आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी एक पत्रक जरी केले आहे. त्याचवेळी त्यामध्ये असे लिहिण्यात आले आहे की, ट्विटरवर ट्विट करत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आणि भाजपने देखील शरद पवार यांची माफी मागावी.

अधिक वाचा  वैफल्यग्रस्त विरोधी पक्षनेत्यांना ब्रेक लागणे कठीण, अपघात अटळ; राऊतांचं ट्वीट,फडणवीसांना दिलं उत्तर

रविकांत वरपे यांनी ट्विटद्वारे भाजपला लगावला टोला
रविकांत वरपे यांनी ट्विट करत लिहिले की, “भाजपाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन ट्विट करत शरद पवार हिंदू धर्माचा द्वेष, अपमान करतात अशी मुक्ताफळे उधळलेली आहेत असं सांगत भाजपाच्या विपरीत बुद्धीची व जाती धर्मात तेढ निर्माण करण्याच्या वृत्तीची कीव येते.”

त्याचवेळी ते पुढे म्हणाले की, “शरद पवार यांनी कधीही कोणत्याही जाती धर्माचा अपमान होईल, अशी कृती केलेली नाही. हिंदू देव देवतांचा अपमान केलेला नाही. उलट हिंदू धर्मातील देवदेवतांचा आदर करत आल आहेत. कित्येक हिंदू दवतांच्या मंदिरांचा पवार यांनी जीर्णोद्धार केलेला आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. पण महाराष्ट्रात काहीही करुन तेढ निर्माण करुन सत्तेसाठी हपापलेले भाजपाचे नेते पवारांना हिंदू विरोधी ठरवून खालच्या पातळीवरचे राजकारण करत आहेत.”