पुणे –शहरातील मुळा-मुठा नदी सुधारणा प्रकल्पाला आमचा विरोध नाही. मात्र, ज्या पद्धतीने हा प्रकल्प राबविला जात आहे. त्यामुळे नदीचे आणि शहराच्या जैवविविधतेचे नुकसान होणार असून याबाबत पर्यावरण तज्ज्ञांच्या भूमिका समजून घेण्यास महापालिका तयार नाही त्यामुळे, आता या प्रकरणी लवकरच थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी दिली.महापालिकेत पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

खासदार चव्हाण म्हणाल्या की, महापालिकेडून राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पास आमचा विरोध नाही. या प्रकल्पामुळे शहरातील पूरस्थिती रोखण्यास तसेच नदी प्रदूषण कमी करण्यास मदतच होणार आहे. या बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या एकाही प्रश्‍नावर महापालिकेने समाधानकारक उत्तर दिलेले नाही तसेच प्रकल्पाचे कामही सुरू केले आहे. त्यामुळे आता थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याच्या सूचना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्या आहेत. त्यानुसार, लवकरच ही बैठक होणार असल्याचे खासदार चव्हाण यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  बाळासाहेब ठाकरेंचे मावळे असे.... थेट उद्धव ठाकरेंना पत्रातून तक्रार