पुणे : जेष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या लहान भगिनी संजीवनी करंदीकर यांचे आज पुण्यात निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. आज सकाळी वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर संध्याकाळी ५ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

करंदीकर यांना काल सायंकाळी दीनानाथ हॉस्पिटल दाखल केले होते, मात्र आज सकाळी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याकडून करंदीकर कुटूंबियांचे फोनवरुन सांत्वन करण्यात आले. संध्याकाळी त्यांच्या अंत्यसंस्काराला ठाकरे कुटुंबिय उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अधिक वाचा  शरद पवार यांच्याकडून राज ठाकरेंनी काहीतरी शिकायला हवं, बृजभूषण यांचा मनसेच्या आरोपानंतर टोला