गेली अनेक वर्ष सेवा परमो धर्म: हे ब्रीदवाक्य घेऊन सेवा करणा-या वारजे माळवाडी परिसरातील सर्व हाॅस्पीटल, क्लिनीक मधील सर्व परिचारिकांचा ” जागतिक परिचारिका दिन ” औचित्य साधुन ट्राॅफी , प्रमाणपत्र , बूके देऊन १०० परिचारिकांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सहकार आघाडी खजिनदार सुभाष आगरवाल , अनंतकाका कुलकर्णी , ऊपाध्यक्ष नमो ग्रुप महाराष्ट्र राज्य , डॅा. मकरंद बोरीकर , डॅा. सुहास सुडोल , डॅा.पारस गंभीर्य , डॅा.जय पवार , व्यंकटेश दांगट , किरण साबळे उपस्थित होते. कार्यक्रमांचे संयोजक  सचिन दशरथ दांगट अध्यक्ष : भाजपा सहकार आघाडी यांनी केले होते.

गेली दोन वर्षे कोरोना महामारीचे काळात या परिचारिकांनी तर सेवेचा कळस गाठला आहे. या सेवाकार्यात काही परिचारकांना तर आपला जीव गमावावे लागले , काही मृत्युशी दोन हात करीत आहेत तर काही रोज मृत्युच्या दाढेत जाऊन काम केले आणि आजही करीत आहेत पण आपली सेवा त्यांनी कुठेही खंडीत होऊ दिली नाही. त्यांच्या अतुलनीय सेवेचा सन्मान कोरोनाचे काळात मोठ्या प्रमाणात करणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे आज शतायु हाॅस्पीटल , माई मंगेशकर हॅास्पीटल , कवडे नर्सिंग होम , संजीवन हॅास्पीटल , चैतन्य हॅास्पीटल , बोरीकर हॅास्पीटल यांचेसह वारजे माळवाडी परिसरातील सर्व लहानमोठ्या हॅास्पीटल मधील परिचारिकांचा भारतीय जनता पार्टी पुणे शहर वतीने सन्मानपत्र ,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

अधिक वाचा  संभाजीराजेंनी मुंबई पहाटेच सोडली; शिवसेनेची ऑफर धुडकावली?