पुणे : आजकाल नवरा बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे भांडण होत असतात. कधी वैवाहिक जीवनामुळे तर कधी घरगुती कारणांमुळे. कधी कधी या भांडणाचे काही मजेशीर कारणे देखील असतात. अनेक वेळा तर लग्न झालेल्या जोडप्यांचा व्हॉट्सअप डीपीवरुन देखील वाद झाल्याच ऐकावयास मिळतं. मात्र हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते.

असाच एक मजेशीर भांडणाचा प्रकार पुण्यामध्ये घडला असल्याचे समोर आहे. एका तरुणाने बायको चक्क व्हॉट्सअपवरील डीपीवरुन भांडत असल्याची तक्रार थेट पुण्याच्या पोलीस आयुक्तांपर्यंत ट्विटरवरुन केली असल्याचे दिसत आहे, ज्याला पुणे पोलीस आयुक्तांनी देखील यावर उत्तर दिलं आहे.

अधिक वाचा  उद्धव ठाकरेंच्या व्यावसायिक पार्टनरचे कसाबशी संबंध ,सोमय्यांचा आरोप

सध्या सोशल मीडिया म्हणजे अफवांचा बाजार असं चित्र निर्माण झालं आहे. मात्र त्यावेळेस याच माध्यमातून लोकांची जागृती करण्यासाठी आणि एका क्लिकवर त्यांच्यासाठी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या शहरांमधील प्रशासकीय यंत्रणा तसेच पोलीस अधिकारी आणि विभाग सोशल नेटवर्किंगचा प्रभावीपणे वापर करत असताना दिसत आहेत.

यामध्येही महाराष्ट्रात मुंबई पोलीस आणि पुणे पोलिसांची ट्विटर अकाऊंट्स देखील खास लोकप्रिय आहेत. या दोन्ही अकाऊंटवरुन मिम्स आणि तरुणाईच्या भाषेमध्ये ट्रेण्डींग विषयांना धरुन करण्यात येणाऱ्या पोस्ट चांगल्याच व्हायरल होत असतात.

मुख्य अकाऊंट्सोबतच दोन्ही महत्वाच्या शहरांच्या पोलीस आयुक्तांचे देखील वेगळे अकाऊंट्स असून त्यावरही अशा पद्धतीने जनजागृती केली जाते. याच जगजागृतीचा भाग म्हणून नुकताच पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ट्विटरवरुन लाइव्ह वीथ सीपी पुणे सीटी या अंतर्गत सर्वसामान्यांशी ट्विटरवरुन संवाद साधला.

अधिक वाचा  ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी आता जिल्हा न्यायालयाकडे वर्ग- सुप्रीम कोर्ट

झालं असं की, या संवादा दरम्यान प्रतिक कारंजे नावाच्या एका व्यक्तीने थेट पुणे पोलीस आयुक्तांना टॅग करुन प्रश्न विचारला. “मी माझ्या व्हॉट्अप डीपीवर बायकोचा फोटो ठेवत नाही म्हणून ती नेहमी माझ्याशी भांडते,” असं या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

पुढे प्रतिक यांनी यासाठी पुणे पोलिसांनी गुन्ह्यांची उकल करण्यासाठी सेल सुरु करतात तशा पद्धतीने घरगुती हिंसेसाठी चालू केलेल्या भरोसा सेलकडे यासंदर्भामध्ये तक्रार करु शकतो का असा प्रश्न विचारला. याशिवाय “मी यासाठी पुणे पोलिसांच्या भरोसा सेलची मदत घेऊ शकतो का?”, असं देखील प्रतिक यांनी विचारलं.

अधिक वाचा  अभिमानास्पद! अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

यावर पोलीस आयुक्तांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन उत्तर देण्यात आलं. “नेहमी एकमेकांवर भरोसा ठेवंण हे कायम चांगलं असतं. बाकी इतर घरगुती हिंसाचारा संदर्भातील तक्रारींसाठी तुम्ही कोणत्याही वेळी भरोसा सेलशी संपर्क करु शकता,” असं पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी सांगितलं सल्याचे दिसत आहे.या अशाच काही मजेदार प्रश्नांची मजेशीर आणि भन्नाट सल्ला पोलीस आयुक्तांनी या लाइव्ह चॅट दरम्यान दिल्याचं पहायला मिळालं.