आग्राः ताजमहालच्या २२ बंद खोल्या उघडण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज अलाहबादच्या उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. ताजमहाजबाबत योग्य ते संशोधन करुन मगच याचिका दाखल करा, अशा शब्दांत हायकोर्टाने याचिकाकर्ते व भाजपचे नेत्यांना फटकारले आहे.

जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहाल सध्या चर्चेत आहेत. ताजमहालच्या २२ बंद खोल्या उघडण्याची मागणी करणारी याचिकेवर आज अलाहबादच्या उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायाधीश डीके उपाध्याय यांनी याचिकाकर्त्यांना खडे बोल सुनावत जनहित याचिकांच्या व्यवस्थेचा दुरुपयोग न करता आधी ताजमहाल कोणी बांधला याचा अभ्यास करा, विद्यापिठात जाऊन पीएचडी करा आणि मग कोर्टात या, असा सल्ला दिला आहे.

अधिक वाचा  बॉक्स ऑफिसवर ‘धर्मवीर’ नावाचं भगवं वादळ कायम, तीन दिवसांत जमवला 9.08 कोटींचा गल्ला

जनहित याचिका या व्यवस्थेचा दुरुपयोग करु नको, उद्या तुम्ही येऊन न्यायाधीशांच्या कक्षेत जाण्याची परवानगी मागाल. असे कसे चालेल?, असा सवाल कोर्टाने केला. तुम्हाला ज्या विषयाबाबत काही माहिती नाही त्याचा अभ्यास करा. जर तुम्हाला कोणी अभ्यास किंवा संशोधन करण्यापासून रोखलं तेव्हा कोर्टाकडे न्याय मागू शकता, अशा कठोर शब्दांत कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावले आहे.

काय आहे प्रकरण?

दरम्यान, ताजमहाल हे हिंदूंचे तेजोमहालय असून तेथे शिवमंदीर असल्याचा दावा केला जात आहे. ताजमहाल हा खरा तर तेजो महालय आहे आणि हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र आहे, असा दावा करण्यात आला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात भाजपच्या प्रवक्ताने याचिका दाखल केली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला ताजमहालच्या आत २२ खोल्या उघडण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून तेथे हिंदू शिल्प आणि शिलालेख लपलेले आहेत की नाही हे कळू शकेल, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.