पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भारतात आम्हा राजकारणी लोकांपेक्षा सामान्य माणूस शहाणा आहे, असं मत व्यक्त केलं. तसेच लोक आमचं चुकलं तर अक्कल शिकवतात, असंही नमूद केलं. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळाचं उदाहरणही दिलं. ते गुरुवारी (१२ मे) पुरंदर (पुणे) येथे पत्रकारांशी बोलत होते.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार पुरंदरमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी शरद पवार यांनी श्रीलंका आणि पाकिस्तानच्या अराजकतेवर भाष्य केलं आहे. शरद पवार म्हणाले की, देशात आर्थिक संकट प्रचंड आहे. नोटबंदीच्या काळात फक्त अर्थव्यवस्था संकटात आली. त्यांनी अनेक अशा प्रकारचे निर्णय घेतले त्यामध्ये लोकांना सहभागी करायचे असते ते केले नाही. कोरोना काळात एक दिवशी सांगितले सगळ्यांनी थाळी वाजला लोकांनी थाळ्या वाजवल्या परंतु त्याचे उत्तर ते नव्हते अशा अनेक गोष्टी या कालखंडात दाखवल्या गेल्या आहेत असे शरद पवार म्हणाले आहेत.

अधिक वाचा  त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री माणिक साहा; बिप्लब देब यांचा राजीनामा

बाबासाहेबांची घटना देशासाठी जमेची बाजू
भारताची जमेची बाजू ही आहे की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना आणि त्या घटनेमुळे आज आपण स्वतंत्र झालो आहोत. त्या घटनेने देशाला एकसंघ ठेवले ही गोष्टी मान्य करावी लागेल. श्रीलंकेत पाहिले तर राज्य कर्त्यांच्या हातातून सत्ता गेली आहे. लोकं रस्त्यावर आहेत. श्रीलंकेत जसे चित्र आहे तसे पाकिस्तानमध्ये आहे. एक महिन्यापूर्वी त्यांच्या पंतप्रधानांना काढण्यात आले आहे. अशा अनेक घटना आहेत. भुट्टो जेव्हा पंतप्रधान होते त्यांची हत्या करण्यात आली आहे. संविधानाची भक्कम चौकट नसल्यामुळे त्या ठिकाणी लोकशाही सतत संकटात जात असते. आपल्याकडे लोकशाही संकटात जात नाही याचे कारण म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना आहे.

अधिक वाचा  तारक मेहता का उल्टा चष्माला आणखी एक धक्का, शैलेश लोढा यांचा मालिकेला रामराम?

देशातील जनता हुशार
दरम्यान शरद पवार पुढे म्हणाले की, दुसरी गोष्ट चांगली आहे. ती म्हणजे राजकारणी शांतपणे निकाल घेतो. त्याचे उदाहरण द्यायचे झाले तर इंदिरा गांधींनी आणीबाणीचा निर्णय घेतला. लोकशाहीवर संकट आले असे लोकांना वाटले त्यामुळे लोकांनी इंदिरा गांधींचे सरकार पाडलं. त्यावेळी मोरारजी यांच्या हातामध्ये राज्य दिले. परंतु दोन वर्षात त्यांना राज्य चालवता आलं नाही हे दिसले त्यामुळे ज्यांनी इंदिरा गांधी यांचे सरकार पाडलं त्यांच्याकडे पुन्हा राज्य दिले. याचे कारण या देशातील लोकं शहाणे आहेत चुकले तर अक्कल शिकवतात आणि त्याच्यातून दुसरं कोण पुढे आलं तर त्याला संधी देतात.