मुंबई : नुकतीच मुंबईमधुन दुःखद बातमी समोर आली आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांना बुधवारी रात्री दुबईमध्ये हृदविकाराचा तीव्र झटका आला आणि यामध्ये त्यांचे निधन झाले.आमदार रमेश लटके यांनी अंधेरी पूर्व विभागातून आमदार म्हणून निवडून आले होते. ज्यावेळी आमदार रमेश लटके यांना झटका आला तेव्हा त्यांचे कुटूंब दुबईमध्ये शॉपिंग करत होत, अशी माहिती मंत्री अनिल परब यांनी दिली.

आमदार रमेश लटके हे दुबईमधील आपल्या जवळच्या मित्राला भेटायला गेले होते, परंतु बुधवारी रात्री अचानक त्यांना हृदविकाराचा तीव्र झटका आला आणि यामध्ये झटक्यामध्ये त्यांचा अकाली मृत्यू झाला.

अधिक वाचा  'धर्मवीर' सिनेमात राज ठाकरे आणि राणे असल्याने उद्धव ठाकरेंनी क्लायमॅक्स पाहिला नाही',नितेश राणेंची पोस्ट चर्चेत

आमदार रमेश लटके हे फक्त ५२ वर्षांचे होते, आमदार रमेश लटके यांनी २०१४ मध्ये काँग्रेस पक्षामधील सुरेश शेट्टी यांचा पराभव केला आणि पहिल्यांदा आमदार पद मिळवलं.
त्यानंतर २०१९ मध्ये आमदार रमेश लटके यांनी अपक्ष उमेदवार एम पटेल यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. या बरोबरच आमदार रमेश लटके हे मुंबई महापालिकेचे नगरसेवक सुद्धा होते.

सध्या आमदार रमेश लटके यांची पार्थिव दुबईहून भारतामध्ये आणण्याची तयारी सुरु आहे. आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला खूप मोठा धक्का बसला आहे, कारण पक्षामध्ये त्यांची कमी कोणच भरून काढू शकणार नाही.