मुळशी(घोटावडे):- श्री रविकांत दादा धुमाळ यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या वाढदिवसानिमित्त केक न कापता मुलखेड या गावी जाऊन वृक्षारोपणा करून, पर्यावरण पूरक संदेश दिला. नंतर रिहे येथील वेदांत साधना वारकरी गुरुकुल “धी शुद्धीकरण” संस्कार शिबिर, बोरकर मळा येथे भेट देऊन तेथे शिक्षण घेत असलेल्या मुलांना ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाटप केले. तसेच लहान मुलांना खाऊ वाटप केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भविष्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी वचनबद्ध राहू असा शब्द त्यांनी दिला. तसेच पखवाज वादक शुभम शिंदे यांना एक पखवाज भेट म्हणून देण्यात आला. तसेच गुरुकुल साठी आर्थिक मदत देण्यात आली व कातरखडक येथील काळूबाई मंदिरासाठी देणगी देण्यात दिली.तसेच पिंरगूट येथील वैभव महाराज धुडे सोमनाथ महाराज साठे यांच्या गुरूकृपा गुरुकुल ला भजण साहित्य वाटप करण्यात आले.

अधिक वाचा  शैलेश लोढा यांना मिळाला मोठा प्रोजेक्ट, तारक मेहताचा उल्टा चष्मा सोडल्यानंतर करणार हे काम

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सचिन खैरे, नागेश साखरे, ह भ प शितोळे महाराज, संभाजी घारे, जवळगाव सरपंच संतोष जाधव, रिहे सरपंच सौ. दिपाली पडळघरे, उपसरपंच सुरेखा पडळघरे,माजी सरपंच भूषण बोडके, मेहुल पडळघरे, संभाजी केमसे, चंद्रकांत केमसे, संजय खांडेकर, ज्ञानेश्वर खानेकर, आबासाहेब घारे, विनोद तुपे, समीर जाधव, तानाजी धुमाळ,अशोक धुमाळ, सचिन तापकीर, बापू कदम, विकास तापकीर, शैलेश तापकीर, मच्छिंद्र करेकर, पप्पू तापकीर, समीर तापकीर, मंगेश शिंदे, समीर शिंदे तानाजी मालपोटे, शिवाजी भिलारे, शिवाजी खांडेकर, विशाल पारखी, किसन राजिवडे, योगेश बोरकर, प्रदिप गोडांबे, संजय देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.