मुंबई : सुप्रीम कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. पण नेमक्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत स्पष्टीकरण घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, नेमकी निवडणूक कधी घ्यावी याबाबत स्पष्टीकरण मागण्यासाठी निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. यापूर्वी प्रभाग रचना, मतदार यादी, पाऊस यामुळे निवडणुका सप्टेंबरपर्यंत पुढे जाऊ शकत होती. पण निवडणूक आयोगानं पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानं निवडणूक कधी होणार यात संभ्रमाचं वातावरण आहे.

अधिक वाचा  उद्धव ठाकरेंच्या व्यावसायिक पार्टनरचे कसाबशी संबंध ,सोमय्यांचा आरोप

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने देखील तयारी सुरू केली आहे.