मुबई: मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे भाजपचे राज्यसभेचे खासदार संभाजीराजे आता लवकरच नवीन राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याची चर्चा रंगली आहे. आज भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची संभाजीराजेंनी भेट घेतली होती. आता 12 मे रोजी पुण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून संभाजीराजे मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. राज्यसभेच्या खासदारकीची टर्म संपत आल्यामुळे संभाजीराजे आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. आज सकाळीच संभाजीराजे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे म्हणाले की, ‘माझी भूमिका 12 मे रोजी स्पष्ट करणार आहे.

या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नाही, असे नाही पण काही जे बोलायचे आहे ते मी 12 मे ला बोलणार आहे’, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली होती. त्यानंतर आता पुण्यात 12 मे रोजी मेळावा जाहीर करण्यात आला आहे. या मेळाव्यात संभाजीराजे आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे पोस्टर व्हायरल झाले आहे. या पोस्टरवर ‘महाराष्ट्राच्या भल्यासाठी…नवी दिशा, नवा विचार आणि नवा पर्याय…’ असा मजकूर लिहिला आहे. त्यामुळे संभाजीराजे हे भाजपकडून पुन्हा खासदार होऊन जाणार की नाही ही शक्यता आता मावळत चालली आहे. त्यामुळे राज्यसभेचा कार्यकाळ सम्पल्यानंतर संभाजीराजे नेमकी कोणती घोषणा करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

अधिक वाचा  कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची प्रकृती बिघडली; ७ दिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द