नवी दिल्ली : बिहारच्या सुल्तानगंजमध्ये एका बांधकाम सुरु असणाऱ्या पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर वेगवान वाऱ्यामुळे हे घडल्याचं आयएएस अधिकाऱ्याने सांगितलं.एखादा पूल पडल्यास त्यासाठी वेगानं वाहणारी हवा जबाबदार असल्याचं कुणी म्हटलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना असाच अनुभव आला. बिहारच्या सुल्तानगंजमध्ये एका बांधकाम सुरु असणाऱ्या पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर वेगवान वाऱ्यामुळे हे घडल्याचं आयएएस अधिकाऱ्याने सांगितलं. हे ऐकल्यानंतर नितिन गडकरी यांनी आश्चर्य व्यक्त केले. २९ एप्रिलला सुल्तानगंजमध्ये गंगा नदीवर पुल बांधण्यात येत आहे. यातील एक भाग वादळावेळी पडला. यात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही.

अधिक वाचा  पुणे महापालिकेचे SC आणि ST चे आरक्षण जाहीर; आता महिला आरक्षण सोडतीकडे लक्ष

गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना आयएएस अधिकाऱ्याने सांगितलेल्या कारणाचा किस्सा सांगितला. त्यांनी म्हटलं की, “बिहारमध्ये २९ एप्रिलला एक पूल कोसळला होता. याचं कारण विचारलं तेव्हा सचिवांनी वाऱ्यामुळे हे घडल्याचं सांगितलं. एक आयएएस अधिकारी असं उत्तर कसं काय देऊ शकतो असं गडकरी यावेळी म्हणाले.मला समजलं नाही की वेगवान वाऱ्यामुळे पूल कसा पडू शकतो? नक्कीच काहीतरी चूक झालीय यामुळे हा पूल पडला

गुणवत्तेशी तडजोड न करता बांधकाम करताना खर्च कमी करण्यावर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी भर दिला. बिहारच्या सुल्तानगंजमधील अगुआनी घाटादरम्यान या पुलाची बांधणी २०१४ मध्ये सुरु झाली होती. हा पूल २०१९ मध्ये पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र अद्याप हे पूर्ण झालेलं नाही.

अधिक वाचा  काश्मीर सोडा नाही तर.... तयार रहा! 'आरएसएस'ला आलेल्या धमकीनं खळबळ

सुल्तानगंजचे आमदार ललित नारायण मंडल यांनी या पूल दुर्घटना प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्याचं सांगितलं होतं. तसंच १७१० कोटी रुपयांचा खर्च केल्यानंतरही हा पूल वेगाने वाहणारा वारा सहन करू शकत नसल्याचा हा चौकशीचा विषय आहे असंही गडकरींनी म्हटलं.