पुणे : बालगंधर्व रंगमंदिर महानगर पालिकेकडून पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पुण्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच राजकारण तापले आहे. त्यावर “नवीन रंगमंदिर बांधल्यामुळे अधिक जागा मिळेल, त्यामुळे त्याचाही विचार करावा. बालगंधर्व नवनिर्माणाबाबत रंगकर्मी बसून एकत्र निर्णय घेतील”, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज सांगितले.

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी चंद्रकांत पाटील यांनी आज विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना. ते म्हणाले, पुण्यात नागरिकांना विजेच्या टचाई चा सामना करावा लागत आहे .त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले,नागरिकांना ट्रान्झिट कालावधीत त्रासाचा सामना करावा लागू शकतो. मात्र नंतर सर्व समस्या दूर होत असतात. तरीही सर्वांशी चर्चा केली जाईल, अशी भूमिका पाटील यांनी मांडली.

अधिक वाचा  टेक्सास गोळीबार प्रकरण; प्रियांका चोप्रा शोक व्यक्त करत म्हणाली...

राम नदीच्या शुद्धीकरणासाठी रिव्हर फ्रंटसाठी मोठ्या प्रमाणावर राम नदीच्या किनाऱ्यांचाही समावेश झालेला आहे.,अशी माहिती पाटील यांनी दिली. बावधन येथील कचरा डेपो प्रकल्प करायला नागरिकांनी विरोध केलाआहे. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले,त्याबाबत एक समिती नेमून त्या ठिकाणी जाऊन पाहणी करून दोन दिवसात निर्णय घेतील अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, की त्या ठिकाणच्या लोकांचे समाधान झाल्याशिवाय काम सुरू होणार नाही. प्रस्ताव दिला आहे. काम दोन-तीन दिवस तरी थांबेल. चंद्रकांत पाटील म्हणाले विक्रमकुमार यांच्याबरोबर 23गावांच्या पाण्याच्या प्रश्नावरही चर्चा झाली. त्या भागात रोज पाणी द्या एक दिवसाआड देऊ नका. अशा सूचना त्यांनी दिल्या. यावर एक बैठक ठेवली जाईल. त्यानंतर निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तिसरा महत्त्वाचा विषय उड्डाणपुलाचा होता. उड्डाणपूल व्हावेत. अडचणी असतील तर त्या सोडवल्या पाहिजेत. नागरिक विरोध करत असतील तर पूल पाडणे हा उपाय नाही, असेही ते म्हणाले.