पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या बेधडक बोलण्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. ते भरल्या सभेत अनेकदा कार्यकर्त्यांना डाफरतात. तर कधी विरोधकांनाही अशाच्या सभेतून थेट आव्हान देतात. याची उदाहाणही अनेकदा पाहायला मिळाली आहेत. मात्र आता अजित पवार त्यांच्या भाषणाच्या मिश्किल शैलीमुळे पुन्हा एकादा चर्चेत आले आहे. अजित पवार पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना एका महिला सरपंचांना उद्देशून बोलतात. या सरपंच तर माझ्याकेड रागानेच बघताहेत, मला तर निघून जाऊ वाटला लागलं, त्यानंतर अजित पवार या सरपंचांना हात जोडत बोलतात. ओ ताई माझ्याकेड रागाने बघू नका, माझ्यावरचा राग हिच्यावर काढा म्हणत खासदार सुप्रिया सुळेंकडे हात दाखवतात. त्यानंतर कार्यक्रमातील कार्यकर्त्यांमध्येही हशा पिकलेलेला दिसून आला. तसेच अजित पवारांचं हेच वक्तव्य चर्चेत नाही राहिलं तर त्यांनी आजही कार्यकर्त्यांचे पुन्हा कान टोचले आहेत.

अधिक वाचा  परबांच्या घरावरील ईडीच्या धाडीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया!, ईडीकडून एवढी माफक अपेक्षा आहे!

निवडूणही द्यायचं आणि विनंतीही करायची?

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, एवढं चांगलं सीबीएससी स्कूल आपण उभारतोय, पण स्टाफ त्या तोडीचा मिळाला पाहिजे. आता आयुष प्रसाद जिल्हा परिषदेचे मालक झालेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष बाजूला झालेत. पहिलं आयुष प्रसादला काही सांगितलं तर म्हणायचा हा दादा करतो आता तेच जरा सदस्यांना पण सांगा. म्हणजे आम्ही यांना निवडून पण द्यायचं अन काम करा म्हणून विनंतीही करायची, असे म्हणत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांना अजित पवार यांनी सुनावल्याचे दिसून आले. तसेच आता माझ्याकडे एकजण आला दादा वीरला बँक उघडली पाहिजे. अरे दुर्गाडे आहेत ना अध्यक्ष, ही काम घेऊन माझ्याकडे यायचं नाही. दुर्गाडे सगळ्या नियमाप्रमाणे काम चटचट जागेवर झाली पाहिजेत, असा दमही त्यांनी भरला.

अधिक वाचा  "निवडणूक बिनविरोध नाही, सगळा खेळ..." राज्यसभा निवडणुकीबाबत अजित पवारांचे विधान

अनेकजणांना सवय असते…

तसेच कार्यकर्त्यांना तारखा देण्यावरूनही अजित पवारांनी ऐकवलं आहे. मला अजिबात पटत नाही, काम घेऊन ये मुबंईला ये पुण्याला. मी तर जागेवर काम करतो, काही लोकांना सवय असते जागेवर काम होणार असले तरी ये मुबंईला ये पुण्याला म्हणायची, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले ही महान व्यक्तीमत्व आपल्या भागात होऊन गेले याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. 1995 ला इथं आम्ही महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच स्मारक बांधले. आज पाहतोय तर इथं दरवाजाचा नाही, कुठं गेला काय माहिती. गावकऱ्यांची जबाबदारी नाही का…? सरकार जे देत त्याची व्यवस्था नीट ठेवायची? आत्ता आमदार संजय जगताप यांनी मोठी यादी वाचली…हे पाहिजे ते पाहिजे….आम्ही देऊ हो….पण ते व्यवस्थित ठेवायची जबाबदारी गावकऱ्यांची नाही का? असे म्हणत त्यांनी गावकऱ्यांनाही सवाल केले.