रिहे(मुळशी):-श्री भूषण बोडके यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त असलेल्या पदी प्रभारी सरपंच म्हणून सौ.सुरेखा प्रवीण पडळघरे या काम पाहत होत्या. अखेर दिनांक ०९/०५/२०२२ रोजी सरपंच पदाची निवडणूक जाहीर होऊन सौ.दिपाली मेहुल पडळघरे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणूक अधिकारी म्हणून सर्कल भाऊसाहेब गायकवाड यांनी काम पाहिले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी सौ. टाकळकर मॅडम व तलाठी भाऊसाहेब गद्रे उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद सदस्य शंकरभाऊ मांडेकर, काँग्रेस कमिटी अध्यक्ष गंगाराम मातेरे, शिवसेना नेत्या सौ. स्वाती ताई ढमाले, माजी शिवसेना तालुकाप्रमुख रविकांत दादा धुमाळ, PMRDA सदस्य सुखदेव तापकीर, बाबाजी शेळके, अनुपजी मारणे, अनिल मातेरे, जवळगाव सरपंच संतोष जाधव, कृ.उ.बा.स. संचालक दादाराम मांडेकर, भागूजी मालपोटे, सौ.रेखा ताई शिंदे, माजी सरपंच भूषण बोडके, उपसरपंच सुरेखा पडळघरे,ग्रा. प. स. नवनाथ ओझरकर,शेखर शिंदे, धनंजय बोडके, ज्योती खेंगरे, सारिका मोरे, रूपाली वाघ उपस्थित होते.
तसेच ग्रामस्थ अनिल मोरे, नामदेव आप्पा शिंदे, प्रवीण पडळघरे,माऊली पडळघरे, मेहुल पडळघरे, राहुल पडळघरे,निलेश पडळघरे, दिलीप ओझारकर, सुरेश आबा शिंदे, पोलीस पाटील सौ. सारिका ताई मिंडे, अविनाश खेंगरें, अरबट पाटील, चंद्रकांत पडळघरे, साहेबराव पडळघरे, स्वप्निल शेलार, केशव पडळघरे आदी मान्यवर उपस्थित होते.